आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील कोविड रुग्णसंख्या 2.81 लाख, एकूण रुग्णसंख्येच्या 2.78%.


बरे झालेल्यांची एकूण संख्या 0.97 कोटींहून जास्त

Posted On: 25 DEC 2020 3:27PM by PIB Mumbai

 

भारतातील कोविड रुग्णसंख्या आज 3 टक्क्यांनी  घटली आहे, आणि आज ती एकूण रुग्णसंख्येच्या  2.78% आहे.

दैनंदिन कोविड बाधितांच्या संख्येहून दैनंदिन रोगमुक्तांची संख्या जास्त असल्यामुळे उपचाराधीन (रुग्णालयातील आणि बाहेरील एकूण)  रुग्णसंख्या सातत्याने घटताना दिसते आहे. कोविड रुग्णसंख्या आज 2,81,919 राहिली.

28 दिवस सातत्याने राहिलेला हा कल कायम राखत भारतात गेल्या 24 तासातही  दिवसभरातील बाधितांच्या संख्येहून दिवसभरातील रोगमुक्तांची संख्या जास्त नोंदली गेली.

कोविडबाधितांची संख्या 23,067  असताना 24,661 जण कोविडमुक्त झाल्याचे नोंदवले गेले. यामुळे गेल्या 24 तासात हा फरक 1,930 इतका झाला आहे.

जगातील दर दशलक्षामागे रुग्णसंख्या लक्षणीयरित्या कमी असणाऱ्यां देशांपैकी  भारत एक आहे (7,352). अगदी पश्चिम गोलार्धातील इतर देशांहूनहूनही भारतात खूप कमी रुग्णसंख्या आहे. जागतिक पातळीवर दर दशलक्षामागे रुग्णसंख्येचे प्रमाण 9,931 आहे.

रोगमुक्तीच दर 95.77%  पर्यंत सुधारला आहे. एकूण रोगमुक्तांची संख्या 0.97 कोटींवर (97,17,834) पोचली आहे. सध्या बरे झालेल्यांच्या आणि बाधितांच्या संख्येतील फरक 94,35,915 आहे.

नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 75.86% संख्या 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहे.

कोविडमधून बरे झालेल्यांची नवी संख्या केरळमध्ये 4,801 आहे, तर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 3,171 and 2,054 असल्याचे नोंदवले गेले आहे.

नव्याने बाधित झालेल्यांपैकी 77.38% जण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

गेल्या 24 तासात केरळमध्ये 5,177 जणांची  बाधित म्हणून नोंद झाली. महाराष्ट्रातील दैनिक रुग्णसंख्या काल 3,580 होती तर पश्चिम बंगालमध्ये 1,590 नव्या बाधितांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात नोंदवल्या गेलेल्या बाधितांच्या 336 या मृत्यूसंख्येपैकी 81.55% संख्या ही दहा राज्ये वा केंद्रशासित प्रदेशातील आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 26.48%  कोविड मृत्यू  महाराष्ट्रातच झाले. ही संख्या 89 होती. दिल्लीतही कोविड मृत्यूची संख्या 37 होती.

जागतिक पातळीवर तुलना  करता, जगातील दर दशलक्षामागे कोविड-मृत्यूदर लक्षणीयरित्या कमी असणाऱ्या देशांपैकी  भारत एक आहे(106). भारतातील मृत्यूदर आज 1.45% राहिला.

***

G.Chippalkatti/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1683588) Visitor Counter : 177