पंतप्रधान कार्यालय
24 डिसेंबर रोजी पंतप्रधान विश्व-भारती विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाला संबोधित करणार
Posted On:
22 DEC 2020 6:01PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विश्वभारती विद्यापीठ, शांतीनिकेतनच्या शताब्दी समारंभाला संबोधित करणार आहेत. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि केंद्रीय शिक्षणमंत्रीही उपस्थित राहतील.
विश्व-भारतीविषयी
1921 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेले, विश्वभारती हे देशातील सर्वात जुने केंद्रीय विद्यापीठ आहे. मे 1995 मध्ये संसदेच्या कायद्यानुसार विश्व भारती हे केंद्रीय विद्यापीठ "राष्ट्रीय महत्वाची संस्था" म्हणून घोषित करण्यात आले. विद्यापीठाने गुरुदेव टागोरांनी आखलेल्या अध्यापनशास्त्राचे अनुसरण केले, हळूहळू यात इतर विद्यापीठांनुसार बदल होत गेला. पंतप्रधान हे विद्यापीठाचे कुलपती आहेत.
****
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1682719)
अभ्यागत कक्ष : 545
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam