आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्येतली घट कायम, उपचाराधीन रुग्णसंख्या 3.08 लाख
Posted On:
19 DEC 2020 2:00PM by PIB Mumbai
गेल्या काही आठवड्यापासूनचा कल कायम राखत भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 3.09% घटली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशात एकूण 25,152 जण कोविड बाधीत असल्याचे आढळले, तर याच कालावधीत कोविडमधून बरे झालेल्यांची नवी संख्या 29,885 आहे. गेल्या 24 तासात एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या 5,080 ने घटली आहे.
भारतातील दर दहा लाख लोकसंख्येमागील उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण (223) जगातील सर्वात कमी प्रमाणांपैकी आहे.
या जागतिक महामारीविरोधात चाललेल्या लढ्यात भारताने आणखी एक मैलाचा टप्पा गाठला. रोगनिदान चाचण्यांच्या एकूण संख्येने 16 कोटींचा टप्पा ओलांडला. भारतातील एकूण दैनंदिन रोगनिदान चाचण्यांची क्षमता 15 लाखांपर्यंत पोचली आहे.
नियमितपणे चाललेल्या व्यापक रोगनिदान चाचण्यांमुळे बाधितांचे प्रमाण कमी होत आहे.
कोरोनातून मुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येने 95.5 लाखांचा (95,50,712) टप्पा आज ओलांडला.
गेल्या 24 तासात केरळमध्ये 4,701 रुग्ण बरे झाले तर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 4,467 and 2,729 रुग्ण बरे झाले.
गेल्या 24 तासात केरळमध्ये 5,456 रुग्णांची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये 2,239 नव्या बाधितांची नोंद झाली तर महाराष्ट्रातील दैनिक रुग्णसंख्या काल 1,960 होती.
गेल्या 24 तासांमध्ये 347 मृत्यूंची नोंद झाली.यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 75 मृत्यूंची नोंद झाली.
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1681955)
Visitor Counter : 214
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam