PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
11 DEC 2020 7:34PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 11 डिसेंबर 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
आपली संरक्षण भागीदारी म्हणजे द्विपक्षीय संबधांचा एक मजबूत स्तंभ बनत आहे. मागील वर्षी उभय देशाच्या सशस्त्र दलांचा पहिला संयुक्त सैनिक सराव झाला. अंतराळ आणि अनु ऊर्जा क्षेत्रांमध्ये आपल्या संयुक्त प्रयत्नाना बळकटी येत आहे. कोविड-19 महामारीच्या या कठीण काळात दोन्ही देशांनी औषधांचा पुरवठा करणे तसेच एकमेकांच्या नागरीकांना सुरक्षित स्वदेशात पोहोचवण्याच्या अशा अनेक क्षेत्रात एकमेकांना भरपूर सहकार्य केले. आपल्या दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या वाटा वाढत आहेत. गुजरात आणि अन्दिजों यांच्यातील यशस्वी भागीदारीच्या धर्तीवर आता हरयाणा आणि फरगाना यांच्यात सहकार्याची रूपरेषा आखली जात आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
भारतात उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या एकूण संख्येत आज लक्षणीय घट होऊन ती 3.63 लाख (3,63,749) झाली आहे. 146 दिवसांनंतरची ही सर्वात कमी संख्या आहे. 18 जुलै 2020 रोजी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 3,58,692 होती.
देशात उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या एकूण संख्येत घट होण्याचे प्रमाण कायम आहे. भारताच्या सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांचे प्रमाण एकूण बाधित संख्येच्या केवळ 3.71% आहे.
गेल्या 24 तासांत 37,528 रुग्ण बरे झाले आणि त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत 8,544 ची घट झाली आहे.
कर्नाटकमध्ये काल सर्वाधिक 5,076 रुग्ण बरे झाले. त्याखालोखाल महाराष्ट्रात 5,068 तर केरळमध्ये 4,847 रुग्ण बरे झाले.
महाराष्ट्रात सर्वाधिक 6,703 इतके सरासरी रुग्ण बरे झाले, त्याखालोखाल केरळमध्ये 5,173 आणि दिल्लीत 4,362 रुग्ण बरे झाले.
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स:
महाराष्ट्रात गुरुवारी 3,824 नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 18,68,172 एवढी झाली. मुंबईत गेल्या 24 तासांत 798 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली, यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,88,696 एवढी झाली. तसेच शहरात झालेल्या 13 मृत्युमुळे मृतांची एकूण संख्या 11,000 पर्यंत पोहचली. सध्या विविध रुग्णालयांमध्ये 11943 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.
MC/ST/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1680058)
Visitor Counter : 271