पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 11 डिसेंबर 2020 रोजी आंतरराष्ट्रीय भारती महोत्सवाला संबोधित करणार
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2020 10:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी, 11 डिसेंबर, 2020 रोजी सायंकाळी 4.30 वाजता आंतरराष्ट्रीय भारती महोत्सवाला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. यंदा या महोत्सवाचे आभासी पद्धतीने आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कवी आणि कलाकार सहभागी होणार आहेत. महाकवी सुब्रमण्य भारती यांच्या 138व्या जयंती निमित्त वनविल सांस्कृतिक केंद्राच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
* * *
S.Thakur/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1679566)
आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
Assamese
,
Tamil
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam