मंत्रिमंडळ

भारत आणि लक्झेंबर्ग दरम्यान द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या करण्यासंबंधीच्या सेबीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 09 DEC 2020 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2020

 

सेबी अर्थात भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ आणि लक्झेंबर्गची सीएसएसएफ ही आर्थिक संस्था यांच्यादरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या करण्याच्या सेबीच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

 

उद्दीष्टे:

या करारामुळे प्रतिभूती नियमनाच्या क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान सहकार्य मजबूत करणे आणि तंत्रज्ञानविषयक माहिती आदानप्रदान करण्यासाठी पर्यवेक्षी कार्याला मदत करून प्रभावीपणे कार्य करण्यासाठी योगदान देणे आणि भारत तसेच लक्झेंबर्गमधील प्रतिभूती बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या कायदे आणि नियमांची परिणामकारक अंमलबजावणी करणे ही या कराराची उद्दिष्टे आहेत.

 

महत्त्वाचे परिणाम :

सेबीप्रमाणेच सीएसएसएफ ही संस्था आंतरराष्ट्रीय प्रतिभूती महामंडळाच्या बहुपक्षीय करारातील सह-स्वाक्षरीकर्ता आहे. मात्र, त्या करारात, तंत्रज्ञानविषयक मदतीच्या तरतुदीला जागा नव्हती. प्रस्तावित द्विपक्षीय सामंजस्य करार, सुरक्षिततेच्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माहिती देवाण-घेवाण आराखडा मजबूत करण्याच्या दिशेने योगदान देण्याबरोबरच तांत्रिक सहाय्य कार्यक्रम स्थापित करण्यात मदत करेल. हा तंत्रज्ञानविषयक मदत कार्यक्रम संबंधित अधिकाऱ्यांना भांडवली बाजार, क्षमता बांधणीसाठीचे उपक्रम आणि कर्मचारी वर्गाच्या प्रशिक्षण कार्यक्रम यांच्याशी संबंधित विषयांवर सल्ला घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.

 

पार्श्वभूमी:

सेबी ही संस्था गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करणे आणि भारतात प्रतिभूती बाजाराला प्रोत्साहन देऊन त्यावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन झाली आहे. प्रतिभूती बाजारातील व्यवहारांचे नोंदणीकरण, पर्यवेक्षण करून प्रतिभूतींच्या खोट्या किंवा चुकीच्या, बेकायदेशीर व्यवहारांना प्रतिबंध करणे आणि त्याविषयी देश किंवा परदेशातील संबंधित अधिकारी व्यक्ती किंवा संस्थेला सूचित करण्याचे काम सेबी करते.

सीएसएसएफ ही लक्झेंबर्गमधील कायदेविषयक सरकारी संस्था आहे. विमा क्षेत्र वगळता लक्झेंबर्गच्या संपूर्ण इतर आर्थिक केंद्राचे विवेकी पर्यवेक्षण करणारे हे सक्षम प्राधिकरण आहे. सीएसएसएफ ही संस्था लक्झेंबर्गमधील प्रतिभूती बाजाराचे नियमन आणि पर्यवेक्षण करण्यासाठी कायदेशीररीत्या जबाबदार देखील आहे.

 

* * *

S.Thakur/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1679503) Visitor Counter : 232