आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात एका दिवसात नव्याने नोंदल्या जाणाऱ्या कोविडग्रस्तांची संख्या 5 महिन्यांनतर नीचांकी पातळीवर


सद्यस्थितीला देशात एकूण 3.83 लाख कोविड सक्रीय रुग्ण, एकूण बाधितांच्या 4% हूनही कमी प्रमाण

कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्याने घसरण; प्रतिदिन 400 हून कमी रुग्णांचे बळी

Posted On: 08 DEC 2020 2:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020

कोविड विरुद्धच्या लढाईत भारताने आता महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच गेल्या 24 तासांत नोंदल्या गेलेल्या नव्या कोविडग्रस्तांची संख्या 27,000 हून कमी म्हणजे 26,567 इतकी झाली आहे. यापूर्वी गेल्या 10 जुलैला ही संख्या 26,506 इतकी कमी होती.

 प्रतिदिन कोविड मुक्त होणाऱ्यांची सतत वाढती संख्या आणि मृत्युदरातील शाश्वत घसरण यामुळे भारतातील एकूण सक्रीय कोविड ग्रस्तांच्या संख्येत नियमितपणे घसरण होण्याचा कल कायम आहे.

कोविडविरुद्धच्या लढाईत आणखी एक शिखर सर करत, भारतात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णाची संख्या एकूण बाधितांच्या 4% हूनही कमी झाली आहे.

सक्रीय कोविड संसर्ग ग्रस्तांची संख्या कमी होऊन 3 लाख 83 हजार झाली आहे. देशात सध्या  सक्रीय असलेल्या कोविड रुग्णांची संख्या आता एकूण कोविड बाधितांच्या 3.96% म्हणजे 3,83,866 झाली आहे.

 गेल्या 24 तासांच्या कालावधीत 39,045 रुग्ण नव्याने रोगमुक्त झाल्याची नोंद आहे. त्यामुळे या कालावधीतील एकूण कोवीड सक्रीय रुग्णांची संख्या 12,863 नी कमी झाली.

एका दिवसात नव्याने कोविड संसर्ग होणाऱ्यांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने रोगमुक्तीचा दर 94.59% वर पोहोचला आहे. कोविड संसर्गातून बरे झालेल्यांची एकूण संख्या आज 91,78,946 इतकी आहे.

नव्याने रोगमुक्त झालेल्या कोविड बाधितांपैकी 76.31% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकवटलेले आहेत.

देशभराचा विचार करता, गेल्या 24 तासांत कोविडमुक्त झालेल्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 7,345 इतकी असून त्याखालोखाल केरळमध्ये 4,705 तर दिल्लीत 3,818 रुग्ण काल कोविडमुक्त झाले आहेत.

 नोंद झालेल्या एकूण नव्या कोविड बाधितांमधील 72.50% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

केरळमध्ये  गेल्या 24 तासांत 3,272 व्यक्ती नव्याने कोविडग्रस्त झाल्या. या काळात, महाराष्ट्रात 3,075 तर पश्चिम बंगालमध्ये 2,214 नव्या कोविडग्रस्तांची नोंद झाली.

 कोविडमुळे देशात गेल्या 24 तासांत मृत्यू पावलेल्या 385 रुग्णांपैकी 75.58% रुग्ण देशाच्या 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

नव्या बळींपैकी 16.36% म्हणजे 63 रुग्ण दिल्लीतील होते तर पश्चिम बंगालमध्ये 48 रुग्ण आणि महाराष्ट्रात 40 रुग्ण मृत्युमुखी पडले.

देशभरात कोविडमुळे रोज मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 400 पेक्षा कमी व्यक्तींना कोविडचा संसर्ग झाला अशी नोंद झाली आहे.

 

U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1679056) Visitor Counter : 328