आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत लक्षणीय घट, 138 दिवसांनंतर ती 4.03 लाखांवर
Posted On:
06 DEC 2020 1:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2020
भारतातील सक्रिय रुग्णसंख्या लक्षणीय कमी होऊन ती आज 4.03 लाख (4,03,248) इतकी झाली आहे. 138 दिवसांनंतर हा सगळ्यात कमी दर आहे.
मागील नऊ दिवसांमधील सातत्य कायम ठेवत, भारतात गेल्या 24 तासात दैनंदिन नव्या रुग्ण संख्येपेक्षा रोज बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येची नोंद झाली आहे.
36,011 लोक कोविड बाधित आढळले, तेव्हा याच काळामध्ये 41,970 नव्याने बऱ्या होणाऱ्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
गेल्या सात दिवसांत प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे नवीन रुग्णसंख्या 186 इतकी आहे. ही जगात सर्वांधिक कमी संख्या आहे.
एकूण बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने 91 लाखांचा (91,00,792) टप्पा पार केला आहे.
76.6% ही नव्याने बरे झालेली रुग्ण संख्या 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांमधील आहे, अशी नोंद करण्यात आली आहे. दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची नोंद, महाराष्ट्रात 5,834 इतक्या नव्याने बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येची करण्यात आली आहे.
75.70 % नवीन रुग्ण संख्या ही 10 राज्य / केंद्राशासित प्रदेश यांमधील आहे.
केरळमध्ये दैनंदिन सर्वाधिक नव्या 5,848 इतक्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 4,922 इतक्या नव्या रुग्णांची नोंद आहे.
गेल्या 24 तासात 482 नवीन मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेश यामध्ये 79.05% नोंद आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (95) मृत्यू नोंदविले गेले.
मागील आठवड्यात भारतात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे दररोज नोंद करण्यात आलेल्या मृत्यूंची नोंद (3) ही जगातील सर्वात कमी संख्येपैकी आहे.
* * *
M.Chopade/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678698)
Visitor Counter : 272
Read this release in:
Odia
,
Tamil
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam