गृह मंत्रालय
नौदल दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय नौदलाला दिल्या शुभेच्छा
“नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलातील सर्व धैर्यवान कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा”
“देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करण्यासाठी आणि आपत्तीकाळात देशाची सेवा करण्यासाठी आपल्या देशाच्या महाशक्तिशाली नौदलाने दर्शविलेल्या अविचल वचनबद्धतेचा भारताला अभिमान आहे”
Posted On:
04 DEC 2020 4:02PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आजच्या नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाला शुभेच्छा दिल्या आहेत.
“भारतीय नौदलातील सर्व धाडसी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मी नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि अनेक आपत्तींच्या वेळी देशाची सेवा करण्यासाठी आपल्या देशाच्या महाशक्तिशाली नौदलाने दर्शविलेल्या ठाम वचनबद्धतेचा भारताला अभिमान आहे” असे शहा यांनी त्यांच्या ट्वीट संदेशात म्हटले आहे.
दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाला आपल्या देशाच्या आणि नौदलाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात, ऑपरेशन ट्रायडंटच्या कारवाईदरम्यान भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्रवाहू जहाजांनी क्षेपणास्त्रांचा मारा करून पाकिस्तानची कराची येथे उभी असलेली जहाजे, तेल साठे आणि किनाऱ्याचे संरक्षण करणारी सामग्री यांच्यावर यशस्वी हल्ला करून त्यांचा नाश केला होता. भारतीय नौदलाने या 1971 च्या कारवाईत युद्धासाठी चाल करणारी आणि महत्त्वाच्या युध्दसामग्रीचे साठे असणारी अनेक जहाजे बुडविण्यात यश मिळविले. भारतीय नौदलाच्या विक्रांत जहाजावरून भरारी घेतलेल्या लढाऊ विमानांनी चितगाव आणि खुलना इथली शत्रुपक्षाची बंदरे आणि हवाई क्षेत्रांवर हल्ला करून अनेक जहाजे, संरक्षण सुविधा आणि सामग्री नष्ट केली. कराचीवर केलेले क्षेपणास्त्र हल्ले आणि विक्रांत जहाजावरून केलेले हवाई हल्ले या दोन्ही हल्ल्यांमुळे त्यावेळच्या पूर्व पाकिस्तान मध्ये पाकिस्तानी सैन्याला हार पत्करावी लागली.
*****
G.Chippalkatti/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678300)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam