आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

13 कोटींपेक्षा अधिक चाचण्या करीत भारताने ओलांडला महत्त्वपूर्ण टप्पा


मोठ्या संख्येने केलेल्या चाचण्यांमुळे बाधित रुग्णांच्या दरातील घसरण सुनिश्चित

एकूण रुग्णसंख्येपैकी सक्रिय रुग्ण संख्या 4.86 %

Posted On: 21 NOV 2020 1:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2020

 

जागतिक महामारीशी लढा देत असताना भारताने आता आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. दररोज दहा लाखांहून अधिक चाचण्या करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, गेल्या 24 तासांत, 10,66,022 चाचण्या करण्यात आल्या असून त्यामुळे एकूण चाचणी क्षमतांमध्ये वाढ होऊन ती आता 13,06,57,808 पर्यंत पोहचली आहे.

शेवटच्या एक कोटी चाचण्या या केवळ 10 दिवसांच्या कालावधीमध्ये झाल्या आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001U0RI.jpg

दररोज घेतल्या जाणाऱ्या सरासरी 10 लाखांपेक्षा जास्त चाचण्यांनी हे सुनिश्चित केले आहे की, एकत्रित बाधित रुग्णांचा दर कमी स्तरावर कायम आहे आणि तो सध्या कमी होण्याच्या मार्गावरच आहे. एकूण राष्ट्रीय स्तरावरील बाधित रुग्णांचा दर हा 6.93 % इतका असून, तो 7 % पेक्षा कमी आहे. दैनंदिन बाधित रुग्णांचा दर काल केवळ 4.34 % इतका होता. मोठ्या संख्येने चाचणी क्षमता वाढली असल्यामुळे सहाजिकच बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0024O4T.jpg

गेल्या 24 तासात, 46,232 रुग्ण कोविड बाधित आढळले आहेत. दैनंदिन दरामधील 4.34 % बाधित रुग्ण संख्येचा दर हे दर्शवितो की लोकसंख्येमधून मोठ्या प्रमाणावर चाचण्या करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. युरोपीय आणि अमेरिकेन देशांच्या तुलनेत दैनंदिन रुग्णांमध्ये होणारी वाढ पाहता, भारताने ही महामारी नियंत्रित करण्यासाठी अनेक प्रतिबंधात्नक उपाय योजले आहेत. भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता, केंद्राने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ती कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

भारतात 24 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसंख्येच्या प्रति दशलक्षपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003N4AM.jpg

12 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीच्या प्रति दशलक्ष चाचण्या कमी झाल्या आहेत आणि त्यांना चाचणीच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004N3JD.jpg

भारतातील सक्रिय रुग्णसंख्या 4,39,747 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या प्रमाणात 4.68 % इतकी आहे आणि ते प्रमाण 5 % च्या खाली आहे.

गेल्या 24 तासात भारताने 49,715 इतकी नव्याने बरे झालेल्या रुग्णांची नोंद केली आहे, तर एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 84,78,124 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज 93.67 टक्के इतका सुधारला आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यांच्यातील दरी सातत्याने वाढत आहे आणि सध्या ती 80,38,377 इतकी आहे.

78.19 % बरे झालेली रुग्ण संख्या ही दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005FDLK.jpg

10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 77.69 टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णसंख्या काल 5,640 इतकी नोंदविण्यात आली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006AF7A.jpg

82.62 टक्के मृत्यूची नोंद गेल्या 24 तासांमध्ये 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून करण्यात आली आहे. नव्याने नोंदविलेल्या मृत्यूंपैकी 27.48 टक्के मृत्यू महाराष्ट्रातून नोंदविले आहेत, जी संख्या 155 इतकी आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007F9RL.jpg

* * *

S.Tupe/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1674660) Visitor Counter : 202