पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी केले 17 व्या असियान भारत शिखर परिषदेला संबोधित

Posted On: 12 NOV 2020 11:34PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेचे सध्याचे अध्यक्ष व्हिएतनामचे पंतप्रधान एच ई न्यूगन झ्यून फ्यूक यांच्या आमंत्रणावरून आज 17 व्या असियान भारत शिखर परिषदेत भाग घेतला. आभासी पद्धतीने भरलेल्या या परिषदेत दहा सभासद देशांनी भाग घेतला.

या शिखर परिषदेत बोलताना पंतप्रधानांनी भारताच्या Act East धोरणात असियन देशांना असलेले केंद्रस्थान अधोरेखीत केले. एकसंध, जबाबदार आणि समृद्ध  असियान ही भारताच्या इंडो पॅसिफिक धोरणाचा केंद्रस्थानी आहे. याशिवाय भारत सेक्युरिटी अँड ग्रोथ फोर ऑल इन द रीजन (SAGAR). यातही सहभागी आहे. पंतप्रधानांनी मुक्त, खुला आणि नियमबद्ध इंडो-पॅसिफिक सागरी भाग राखण्यासाठी या भागात भारताचे अभिसरण बळकट करण्याचे महत्व विषद केले.  त्यांनी  सर्व असियान राष्ट्रांना सहकार्याच्या मार्गाने भारताच्या इंडो-पॅसिफिक ओशन ईनिशिएटीव (IPOI) चे आधारस्तंभ बनण्याचे आवाहन केले.

कोविड-19 बाबतीत आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताचा प्रतिसाद आणि मोठ्या प्रमाणावरील सहाय्य यावर पंतप्रधानांनी जोर दिला आणि  या महामारीशी लढा देण्याच्या असियानच्या मनसुब्याचे स्वागत केले. कोविड-19 आसियन रिस्पॉन्स निधीत दहा लाख अमेरिकी डॉलरचा सहभाग पंतप्रधानांनी जाहीर केला.

पंतप्रधानांनी असियन आणि भारत यामधील थेट तसेच डिजिटल संबधांचे महत्व अधोरेखित केले आणि असियन कनेक्टीविटीसाठी एक अब्ज अमेरिकन डॉलरची वित्तीय मदत देण्याच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार केला.  

या क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य नांदावे यासाठी भारत देत असलेल्या योगदानाचा  सर्व आसियन नेत्यांनी उल्लेख केला तसेच असियनमधील भारताच्य़ा केंद्रस्थानाचे स्वागत केले. असियन भारत कृती धोरण 2021 ते 2025 याच्या स्वीकाराचेही सर्व आसियन नेत्यांनी स्वागत केले.

दक्षिण चीन सागरी भाग आणि दहशतवाद यासह सर्वसाधारण स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाबींचाही चर्चेत समावेश होता. आंतरराष्ट्रीय कायद्याचे विशेषतः UNCLOSचे पालन करत नियमाधारित सीमांचे महत्व आणि त्याला चालना याचे महत्व दोन्ही बाजूनी मान्य केले.

दक्षिण चीन सागरी भागात  शांतता, स्थैर्य, सुरक्षितता आणि संरक्षण राखणे तसेच सागरी वाहतूक व उड्डाणाचे स्वातंत्र्य यांना चालना याची सर्वच नेत्यांनी हमी दिली.

 

U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1673151) Visitor Counter : 208