वस्त्रोद्योग मंत्रालय

वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून #Local4Diwali मोहिमेला सुरुवात


भारतीय हस्तकलाकृतींची खरेदी आणि भेटवस्तूने दिवाळी साजरी करण्याचे सर्वांना आवाहन

Posted On: 11 NOV 2020 3:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  11 नोव्हेंबर 2020

हस्तकला हे भारताच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेचे प्रतिक आहे तसेच ते देशातील एक महत्वाचे रोजगार साधनसुद्धा आहे. हस्तकलाकार किंवा संबधित कारागिरांपैकी 55% महिला असल्यामुळे हे क्षेत्र म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाचे एक साधन आहे.

भारतीय हस्तकलाकृती वापराकडे आपला कल असला पाहिजे आणि इतरांना, जास्तीत जास्त जणांना त्याबद्दल माहिती करून द्यावी  असे  पंतप्रधानांनी म्हटले आहे.

वस्त्रोद्योग मंत्र्यांनी सर्वांना केलेल्या आवाहनात म्हटले आहे की:

पंतप्रधानांनी 9 नोव्हेंबरला केलेल्या आवाहनाने प्रेरित होउन आपण स्थानिक वस्त्रप्रावरणे आणि हस्तव्यवसायाला आपले समर्थन दर्शवण्यासाठी एकत्र येउया. एक साधा मातीचा दिवा असो की देशी वस्त्र, अंथरूण वा पडदे  यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तू वा तुमच्या संबधितांना देण्याच्या भेटवस्तूप्रत्येक खरेदीला या दिवाळीत महत्व आहे. विणकर, स्थानिक कलाकृती, स्थानिक छोटे व्यवसाय यांच्या माध्यमातून दिवाळी खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्यांना स्थान द्या  आणि #Local4Diwali हॅशटॅग वापरा.  आपल्या आवडत्या वस्तूचे छायाचित्र घ्या. मग ते वस्त्र असो वा तुम्हाला कुणाला द्यायची भेटवस्तू वा दिवाळीत घरी वापरायला आवडेल अशी हस्तकलाकृती, तुम्ही ती ज्यांच्याकडून घेतली त्यांना टॅग करा आणि #Local4Diwali  हा हॅशटॅग वापरा. या कठीण काळात आपली विक्री वाढवण्यासाठी त्यांना या ट्रेंडचे सहाय्य होईल, गरजेच्या काळातील आपल्या सहकार्यामुळे अनेकांना पुन्हा उभे राहण्याची संधी मिळेल.

 

S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1671909) Visitor Counter : 151