पंतप्रधान कार्यालय

एक श्रेणी-एक निवृत्तीवेतन (ओआरओपी) ला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी ज्येष्ठ सैनिकांच्या कार्याला केला सलाम

Posted On: 07 NOV 2020 7:18PM by PIB Mumbai

 

ओआरओपी म्हणजेच एक श्रेणी-एक निवृत्तीवेतन व्यवस्थेला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ज्येष्ठ सैनिकांच्या देशसेवेला सलाम केला आहे. 

"पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी, देशाच्या रक्षणासाठी अतुल्य शौर्य गाजवणाऱ्या आपल्या महान सैनिकांच्या कल्याणासाठी, भारताने एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. ओआरओपी व्यवस्थेला पाच वर्षे पूर्ण होणे हा एक संस्मरणीय प्रसंग आहे. भारताने यासाठी अनेक दशके वाट बघितली होती.   यानिमित्त सर्व सैनिकांनी देशासाठी दिलेल्या सेवेबद्दल मी त्या सर्वांना वंदन करतो!", असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Today, five years ago, India took a historic step towards ensuring the well-being of our great soldiers, who courageously protect our nation. #5YearsOfOROP is a momentous occasion. India waited for OROP for decades.

I salute our veterans for their remarkable service! pic.twitter.com/VmZUsJCAJP

— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2020

 

M.Chopade/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1671057) Visitor Counter : 149