आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात सक्रीय रुग्णांचा कमी होण्याचा कल सातत्याने कायम
जगभरात दर दहा लाखांत सर्वाधिक कमी रुग्ण संख्या
सतत तिसऱ्या दिवशी सक्रीय रूग्ण संख्या 6 लाखांपेक्षा कमी
17 राज्य/केंद्रशासित प्रदेशांत दर दहा लाखांमागे रूग्णांचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Posted On:
01 NOV 2020 4:22PM by PIB Mumbai
भारतात सक्रीय रुग्णांचा दर सातत्याने कमी होत असल्याची नोंद होत आहे. जवळपास तीन महिन्यांनंतर ,सतत तिसऱ्या दिवशी, सक्रीय रुग्ण संख्या सहा लाखांपेक्षा कमी आढळुन आली असून सातत्याने ती कमीच होत आहे.
सध्या भारतात सक्रीय रुग्णांची संख्या 5,70,458 आहे.
देशातील सक्रीय रुग्ण दर कमी होत असून तो आता 6.97% इतका आहे, त्यात सातत्याने घट होताना दिसत आहे.
हे सातत्य राखण्याची कार्यक्षमता, राज्य/केंद्रशासित प्रदेश यांच्या सहयोगामुळे साध्य झाली असून, केंद्रसरकारच्या एकात्मिक चाचणी करणे,वेळेवर रुग्ण ओळखणे, त्वरीत रुग्णालयात दाखल करणे आणि सर्व सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालये आणि घरगुती विलगीकरण यात आदर्श मानक उपचार पध्दती सुनिश्चित केल्याने शक्य झाले आहे.
विविध राज्य/केंद्रशासित प्रदेशात सक्रीय रुग्ण संख्या कमी होत असल्याची नोंद वेगवेगळी होत असून लक्ष्यपूर्वक केलेले प्रयत्नांमुळेच हळूहळू कोविड-19चा मुकाबला करणे शक्य झाले आहे.कर्नाटक राज्यातील सक्रीय रूग्ण संख्येत गेल्या 24 तासांत कमालीची घट नोंदविली गेली आहे.
भारतात सक्रीय रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असून,दर दहा लाखांमागे आढळणारी रुग्ण संख्या जगभरात सर्वात कमी आहे. भारतात दर दहा लाखांमागे सरासरी 5,930 इतके रुग्ण आढळून आले आहेत.
17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात दर दहा लाखांमागील रूग्ण संख्या सरासरी पेक्षा कमी आहे.
भारतात मृत्यूदरात सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 470 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद
आहे. देशात दर दहा लाखांमागे मृत्यू पावणार्यांची संख्या कमी झाली असून ती 88 आहे.
21 राज्य/केंद्रशासित प्रदेशात दर दहा लाखांमागे मृत्यू होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.
सक्रीय रुग्णांची टक्केवारी सातत्याने कमी होत असून ,त्याचप्रमाणात बरे होणाऱ्यांची टक्केवारी जास्त आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 74,91,513 इतकी आहे. बरे झालेले रूग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्या तील फरक 69 लाखांपेक्षा जास्त आहे.(69,21,055)
बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने हा फरक रुंदावत आहे.
बरे होणाऱ्यांची संख्या वाढल्याने रूग्ण बरे होण्याच्या राष्ट्रीय दरात सुधारणा होऊन तो 91.54%इतका झाला आहे.गेल्या 24 तासांत 58,684 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 46,963 नवे रूग्ण आढळून आले आहेत.
76% नव्याने बरे झालेले रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशांत आहेत.
कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांत जास्तीत जास्त नवे बरे झालेले रूग्ण असून एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 7000 इतकी आहे. यात दिल्ली आणि पश्चिम बंगाल यांची भर पडली असून, तेथील नव्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 4000 पेक्षा अधिक आहे.
गेल्या 24 तासांत 46,963 नवे रूग्ण आढळून आले आहेत.
त्यापैकी 77% रूग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. केरळमध्ये अजूनही नव्या रूग्णांची संख्या जास्त असल्याची नोंद झाली असून तेथे 7000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, त्या मागोमाग महाराष्ट्र आणि दिल्ली येथे 5000 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या 24 तासांत 470 लोकांचा मृत पावल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 78% पेक्षा जास्त रूग्ण दहा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांत आहेत.
15% पेक्षा जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.(74)
***
B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669333)
Visitor Counter : 216
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam