पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी अहमदाबाद येथे केवडिया आणि साबरमती नदी किनाऱ्यादरम्यान दुतर्फा सागरी विमान सेवेचे केले उद्घाटन

Posted On: 31 OCT 2020 3:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑक्‍टोबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे पाण्यावरील विमानतळ आणि केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला अहमदाबादमधील साबरमती नदी किनाऱ्याशी जोडणाऱ्या सागरी विमान सेवेचे उद्घाटन केले.

 

पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबाद येथील साबरमती नदी किनाऱ्यावर पाण्यावरील विमानतळाचे उद्घाटन केले आणि साबरमदी नदी किनाऱ्यापासून केवडिया पर्यंत असलेल्या सागरी विमान सेवेचे देखील उद्घाटन केले. शेवटच्या टोकापर्यंत दळणवळण पोहोचविण्यासाठी पाण्यावरील नियोजित विमानतळ मालिकेचा हा एक भाग आहे.

 

विमानाला उतरण्यासाठी आखलेले पट्टे किंवा धावपट्टी उपलब्ध नसताना देखील पाण्यावरून विमानाचे उड्डाण करण्याची आणि पाण्यावर उतरण्याची क्षमता या सागरी विमानामध्ये आहे. अशा प्रकारे भौगोलिक क्षेत्र / असे क्षेत्र की ज्यास त्याच्या भौगोलिक कारणास्तव काही आव्हाने आहेत, ते जोडण्यास मदत केली जाऊ शकते आणि विमानतळ आणि धावपट्टी बांधण्यासाठी अधिक खर्च न करता भारतातील दुर्गम भागांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेता येईल. असे लहान आकाराचे पंख असलेली विमाने पाणी असलेल्या पृष्ठभागावर जसे की तलाव, बॅकवॉटर आणि धरणे, वाळूचे रस्ते आणि गवत अशा प्रकारच्या असंख्य पर्यटन स्थळांवर देखील सहज उतरु शकतात.

 

* * *

S.Thakur/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1669093) Visitor Counter : 249