गृह मंत्रालय

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त नवी दिल्लीतील सरदार पटेल चौकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन


राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली पुष्पांजली

राष्ट्रीय एकता दिनी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "लोहासारखे दृढ नेतृत्व, एकनिष्ठता आणि देशभक्तीचे प्रतिक असलेले सरदार पटेलजी आम्हाला सदैव मार्गदर्शन करतील"

केंद्रीय गृहमंत्र्यांनी उपस्थितांना दिली राष्ट्रीय एकता दिनाची शपथ

Posted On: 31 OCT 2020 3:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2020


राष्ट्रीय एकता दिनानिमित्त नवी दिल्लीतील सरदार पटेल चौकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "लोहासारखे दृढ नेतृत्व, एकनिष्ठता आणि देशभक्तीचे प्रतिक असलेले सरदार पटेलजी आम्हाला सदैव मार्गदर्शन करतील. "

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथ देताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले, की, “मी अशी शपथ घेतो की मी माझ्या देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता टिकविण्यासाठी मी स्वतः ला समर्पित करीन, तसेच माझ्या देशबांधवांमधे हा संदेश प्रसारीत करण्यासाठी कठोर परिश्रम करेन. मी माझ्या देशाच्या एकीकरणाचे चैतन्य, जे सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी होते आणि आपल्या कर्तृत्वाने त्यांनी पाहिले होते, त्यासाठी शपथ घेत आहे. मी स्वतः माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सदैव तत्पर असेन”.

श्रेष्ठ देशभक्त सरदार वल्लभभाई पटेल यांना, देशाच्या वतीने कृतज्ञतेने आदरांजली अर्पण करताना आपल्या ट्वीटर संदेशात अमित शाह म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले आणि प्रत्येक भारतीयांच्या हृदयात जगणारे लोहपुरुष सरदार पटेल जी यांना अभिवादन. शेकडो संस्थांनांचे एकत्रीकरण करून आजच्या भक्कम भारताचा त्यांनी पाया रचला. देश त्यांच्या श्रेष्ठ योगदानाला, खंबीर नेतृत्वाला आणि मायभूमीसाठी केलेल्या अतुलनीय समर्पणाला कधीही विसरणार नाही."

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, "भारताचे एकीकरण करण्यापासून ते सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीपर्यंत सरदार पटेल यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी समर्पित केला. देशाच्या वतीने कृतज्ञतापूर्वक मी  श्रेष्ठ देशभक्त आणि लोहपुरुष सरदार पटेल यांच्याप्रती आदर व्यक्त करतो."

 

 

 

 

* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1669067) Visitor Counter : 179