PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
26 OCT 2020 7:23PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 26 ऑक्टोबर 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
I
पुढील काही दिवसांत अनेक सण/उत्सव असून दिवाळी, ईद, भाऊबीज, छटपूजा, गुरू नानक देवजी जयंती आदी सणांच्या काळात कोरोना संकट लक्षात घेऊन संयमाने वागण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना आवाहन केले.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
भारतात 22 मार्च पासूनचा सर्वात कमी मृत्यू दर- रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनासाठी केंद्र, राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या लक्ष्यकेंद्री प्रयत्नामुळे भारतातला मृत्यू दर 1.5% झाला आहे. प्रतिबंधासाठी प्रभावी रणनीती, मोठ्या प्रमाणात चाचण्या, सरकारी आणि खासगी रुग्णालयात प्रमाणित मानक वैद्यकीय व्यवस्थापन यामुळे मृत्यू दरात लक्षणीय घट झाली आहे.
देशात गेल्या 24 तासात 500 हून कमी (480) मृत्यूंची नोंद झाली आहे.
वैद्यकीय व्यवस्थापनात आयसीयु डॉक्टरांच्या क्षमता वृद्धीसाठी नवी दिल्लीतल्या एम्सने ई- आयसीयु हा आगळा उपक्रम हाती घेतला आहे. मंगळवार आणि शुक्रवार अशा आठवड्यातल्या दोन वारी राज्य रुग्णालयातल्या आयसीयु मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्ससाठी तज्ञाकडून टेली/ व्हिडीओ सल्ला सत्रे आयोजित करण्यात येतात. 8 जुलै 2020 पासून ही चर्चा सत्रे आयोजित करण्यात येत आहेत. आतापर्यंत 25 टेली सत्रे आयोजित करण्यात आली असून 34 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातल्या 393 संस्था यात सहभागी झाल्या आहेत.
इतर अपडेट्स:
· येत्या काही वर्षांत "आयुष" जगात मुख्य प्रवाहातील उपचार प्रणाली म्हणून स्वीकाहार्य होईल-केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक- आयुष ही पर्यायी वैद्यकीय उपचार पद्धती आहे. हे चित्र लवकरच बदलेल आणि पारंपरिक आयुष वैद्यकीय उपचार हे जगभरात उपचार मुख्य प्रवाहाशी संलग्न उपचार म्हणून स्वीकारले जातील. आपण सध्या कोरोना महामारीच्या जागतिक संकटाला तोंड देत आहोत. या कठीण काळात आपल्याला प्रतिकार शक्तीचे महत्त्व लक्षात आले. आयुर्वेद आणि योग प्रतिकार शक्ती वाढवितात हे स्वीकारले गेले आहे.
· नव्या सॅनीटायझर आणि जंतुनाशकामुळे रसायनयुक्त जंतूनाशकाच्या दुष्परीणामापासून दिलासा- कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठीचा एक उपाय म्हणून वारंवार हात धुताना रसायन युक्त साबण आणि जंतुनाशकाचा वापर केल्याने कोरडे होणारे हात आणि हाताला येणारी खाज यापासून आता लवकरच सुटका होणार आहे. देशाच्या अनेक भागातले स्टार्ट अप आता रसायन युक्त जंतुनाशकाला टिकाऊ पर्याय आणण्यासाठी सरसावले आहेत.
· केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते उद्या महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील आदिवासी कल्याण उत्कृष्टता केंद्रांचा प्रारंभ- येथे 10,000 आदिवासी शेतकरी बांधवांना गो-आधारित शेती तंत्रज्ञानानुसार शाश्वत नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने शेती करीत असलेल्या शेतकरी बांधवांना सेंद्रिय कृषी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर आदिवासी शेतक-यांना विपणनाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
· केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या त्रिपुरामध्ये 9 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करणार- केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या त्रिपुरात नऊ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. सुमारे 262 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यांसाठी 2752 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यांतर्गत आणि बांग्लादेशाशी वेगवान आणि सुलभ कनेक्टीव्हिटी स्थापन होऊन राज्याच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळणार आहे.
· भारत सरकारच्या, रसायने आणि खते मंत्रालयांर्तगत ,औषध विभागाच्या ,राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाच्या सहकार्याने (NPPA) गोवा येथे मूल्य देखरेख आणि संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
· ट्राइब्स इंडियाच्या माध्यमातून आदिवासींच्या नव्या ताज्या 100 सेंद्रिय उत्पादनांची श्रेणी बाजारात-आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘ट्रायफेड’ने ट्राइब्स इंडियाच्या माध्यमातून आदिवासींच्या नव्या ताज्या 100 सेंद्रिय उत्पादनांची श्रेणी बाजरात आणली आहे. या ’फॉरेस्ट फ्रेश नॅचरल्स अँड ऑरगॅनिक’उत्पादनांचे अनावरण ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रविर कृष्णा यांनी आभासी पद्धतीने केले. दर आठवड्याला नवीन 100 उत्पादने बाजारात आणण्याची तयारी ट्रायफेडने केली आहे.
· खरीप विपणन हंगाम 2020-21 किमान आधार मूल्याने झालेले व्यवहार- या हंगामामध्ये आत्तापर्यंत 12.98 लाख शेतक-यांना या खरेदीचा लाभ झाला आहे. या शेतक-यांकडून किमान आधार मूल्याने 28,542 कोटी रुपये खर्चून अन्नधान्य खरेदी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड—19 संक्रमण परिस्थितीत धार्मिक स्थळे न उघडण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच वार्षिक दसरा मेळाव्याला संबोधित करताना ते म्हणाले, कोरोना संक्रमणाविरोधातील लढाईत राज्यातील लोकांना मदत करण्यास सरकार कटीबद्ध आहे. सुरुवातीपासूनच आपण राज्यातील अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने खुली करण्यासाठी पाठपुरावा केला आणि विरोधकांच्या टीकेनंतरही पुढे आपण याच तत्त्वाचे पालन करु, असे मुख्यमंत्री म्हणाले.
FACT CHECK
*****
M.Chopade/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667649)
Visitor Counter : 185