मंत्रिमंडळ
आयसीएआय, भारत आणि सीपीए, पपुआ न्यू गिनी (CPA PNG) यामधील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
Posted On:
21 OCT 2020 5:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने भारतीय सनदी लेखापाल संस्था (ICAI) आणि सर्टीफाईड प्रॅक्टिसिंग अकाउटंटस, पपुआ न्यू गिनी (CPA PNG) या दोन संस्थांमधील सामंजस्य कराराला मंजूरी दिली. या करारानुसार या दोन्ही संस्था आपली क्षमता वाढवण्यासाठी आणि पपुआ न्यू गिनीमधील लेखा (अकाउंटिंग), आर्थिक आणि लेखापरिक्षण यातील मुलभूत ज्ञान वृद्धींगत करण्यासाठी परस्परांना सहकार्य करतील.
अंमलबजावणी आणि उद्दिष्टे:-
- भारतीय सनदी लेखापाल संस्था (ICAI) आणि सर्टीफाईड प्रॅक्टिसिंग अकाउटंट्स पपुआ न्यू गिनी(CPA PNG) या संस्था पुढील बाबींमध्ये सहकार्य करतील.
- तंत्रविषयक कार्यक्रम, सेमीनार, परिषदा यांचे पपुआ न्यू गिनीमध्ये आयोजन.
- कॉर्पोरेट व्यवस्थापन, तंत्रविषयक संशोधन आणि सल्ला, गुणवत्ता हमी, न्यायवैद्यक लेखापरिक्षण (फोरेन्सिक अकाउंटींग), व्यवसाय वृद्धी, आणि इतर यामध्ये परस्परांना सहकार्य आणि सहयोग.
- हिशेबतपासणी (अकाउंटींग)व्यवसायाबाबतची खुली उपलब्ध माहितीची पपुआ न्यू गिनी व भारत यांच्या दरम्यान तसेच आवश्यकतेनुसार आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण. सीपीए,पीएनजी मधील परिक्षांसाठी ठराविक मॉड्यूल्स तयार करणे.
- विद्यार्थी आणि शिक्षक देवाणघेवाण कार्यक्रम.
- हिशोबतपासणी, अर्थव्यवहार आणि लेखापरिक्षण यामधील कमी कालावधीचे अभ्यासक्रम पुरवणे.
विशेष परिणाम:-
भारतीय सनदी लेखापाल संस्था ICAI ही स्थानिक व्यावसायिक आणि संबधितांना अर्थव्यवहार नोंदणी यांना मदत करणारी नामांकित संस्था आहे. या संकल्पित सामंजस्य कराराद्वारे पपुआ न्यू गिनी भारतीय सनदी लेखापाल संस्थेची विश्वासार्ह आणि सकारात्मक प्रतिमा तयार होण्यास मदत होईल. ऑस्ट्रेलिया- ओशनिया या भागात आयसीएआयचे अनेक सभासद आहेत, त्याचाच पुढील अध्याय पपुआ न्यू गिनी मध्ये लिहिला जाईल. CPA, PNG मधील प्रस्तावित सामंजस्य करार या दोन्ही संस्थांच्या या भागांमधील सभासदांना लाभाचा ठरेल आणि त्यांच्या प्रगतीसाठी सहाय्यक ठरेल.
पार्श्वभूमी:-
भारतीय सनदी लेखापाल संस्था आयसीएआयही लेखापालांच्या कार्यांस नियमितता देण्याच्या उद्देशाने सनदी लेखापाल कायदा 1949 नुसार अस्तित्वात आलेली संवैधानिक संस्था आहे. सर्टीफाईड प्रॅक्टिसिंग अकाउटंट्स पपुआ न्यू गिनी(CPA PNG) ही पपुआ न्यु गिनी मध्ये हिशेबतपासणी आणि लेखापरिक्षण यातील मानके निर्माणासाठी लेखापाल कायदा 1996 नुसार अकाउटींग व्यवसायाचे आकर्षण वाढावे यासाठी अस्तित्वात आलेली संस्था आहे.
B.Gokhale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1666442)
Visitor Counter : 228
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada