आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील सक्रीय रूग्णांत सतत घट
सलग दुसऱ्या दिवशी सक्रीय रूग्णसंख्या 8 लाखांहून कमी
22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत 20,000 पेक्षा कमी सक्रीय रुग्ण
Posted On:
18 OCT 2020 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2020
भारतातील सक्रीय रूग्णांच्या संख्येत सतत घट होत असल्याची नोंद झाली असुन सलग दुसऱ्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 8 लाखांपेक्षा कमी म्हणजे 7,83,311इतकी आढळली. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एकूण पॉझिटीव्ह रूग्णांच्या 10.45% इतकी आहे.
देशातील रूग्णसंख्येचा दर कायम ठेवत 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात सक्रीय रूग्ण 20,000 पेक्षा कमी
13 राज्ये /केंद्रशासित प्रदेशातील सक्रीय रूग्णांची संख्या 20000 पेक्षा जास्त पण 50,000 पेक्षा कमी आहे, तर 3 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात 50,000 पेक्षा जास्त सक्रीय रूग्ण
रूग्ण बरे होण्याचा दर कमी होत असून त्याला पूरक बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत एकूण 65,97,209 रूग्ण बरे झाले आहेत. मुक्त होणाऱ्या तसेच सक्रीय रूग्ण संख्येतील अंतर वाढून 58 लाखांच्या (58,13,898 )वर गेले आहे .देशात रुग्ण बरे होण्याचा दर वाढून आता तो 88.03 %इतका झाला आहे.
गेल्या 24 तासांत 72,614 कोविड रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर 61,871नवीन रूग्ण आढळले आहेत.
नवीन बरे झालेल्या रूग्णांपैकी 79%रूग्ण 10 राज्ये /केंद्रशासित प्रदेशात एकत्रित आहेत.
महाराष्ट्रात एकाच दिवशी, 14000 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असून, रूग्ण बरे होण्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे.
गेल्या 24 तासांत 61,871 नवे रूग्ण आढळून आले आहेत.
नव्या रूग्णांपैकी 79%रूग्ण 10राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
महाराष्ट्रात आजही सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून त्यांची संख्या 10,000 पेक्षा जास्त आहे. त्यानंतर केरळ असून तेथे 9,000 नवे रूग्ण आढळून आले आहेत.
गेल्या चोवीस तासांत 1033 लोकांचा मृत्यु झाला असल्याची नोंद झाली आहे.
यात 10 राज्ये /केंद्रशासित प्रदेशांचा 86% वाटा आहे. 44 %पेक्षा जास्त नवे मृत्यू महाराष्ट्रात झाले असून 463 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
B.Gokhale/S.Patgoankar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665664)
Visitor Counter : 197
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam