आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील कोविडच्या सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होण्याचा कल कायम


सतत दुसऱ्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 9 लाखांपेक्षा कमी

एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे प्रमाण एक-अष्टमांश

Posted On: 10 OCT 2020 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2020

 

देशातील कोविडच्या सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होण्याचा कल आजही कायम आहे. एका महिन्यांनतर काल पहिल्यांदाच देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 9 लाखांच्या खाली गेली होती. आज दुसऱ्या दिवशीही, ही संख्या 9 लाखांपेक्षा कमी आली असून सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होतांन दिसते आहे.

सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या 8,83,185 इतकी आहे.

सध्या देशातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रीय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 12.65% इतकी आहे. हे प्रमाण, एकूण संख्येच्या एक अष्टमांश इतके आहे. 

एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे 60 लाख (59,88,822) इतकी असून, यातूनच सक्रीय रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतील तफावत लक्षात येत आहे.

गेल्या 24 तासांत 82,753 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, नवे 73,272 रुग्ण आढळले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 85.81% पर्यंत वाढला आहे.

देशातील 18 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात रुग्ण बरे होण्याचा दर, राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.  केंद्र सरकारच्या व्यापक टेस्टिंग, आणि जलद रूग्णालयात दाखल करण्याच्या तसेच, प्रमाणित प्रोटोकॉल नुसारच उपचार करण्याच्या धोरणाची, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी योग्य अंमलबजावणी केल्यामुळेच सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

नव्याने बरे झालेल्या रूग्णांपैकी 76%  टक्के रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात असल्याचे आढळले आहे.

महाराष्ट्रात एका दिवसात 17,000  हजार रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्यात, महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे ठरले आहे.

गेल्या 24 तासात देशात कोविडचे 73,272 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी  79%  टक्के रुग्ण, 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आहेत.

यापैकी 79% टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहे. महाराष्ट्रात आजही सर्वाधिक रुग्णसंख्या असून सध्या 12,000  रुग्ण उपचारांखाली आहेत, त्याखालोखाल, कर्नाटक मध्ये रुग्णसंख्या 11,000 इतकी आहे. 

 

गेल्या 24 तासांतदेशभरात कोरोनामुळे 926 रुग्णांचा मृत्यू झाल्यची नोंद आहे. यापैकी सुमारे 82% रुग्ण दहा राज्ये आणि केंद्रसाशित प्रदेशत आहेत. त्याशिवाय, महाराष्ट्रात आणखी नोंद करण्यात आली आहे.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1663361) Visitor Counter : 191