PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 08 OCT 2020 8:06PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 8 ऑक्टोबर 2020

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक ट्वीट करत, सर्व जनतेला कोरोनाविरुध्दच्या लढाईत एकत्र येण्याचे आवाहन केले. कोरोनाविरुद्धच्या महत्वपूर्ण संदेशाचा पुनरुच्चार करत, त्यांनी म्हटले. “मास्क वापरा, हात धुवा आणि सामाजिक अंतर राखा आणि ‘दो गज की दुरी’या मंत्राचे पालन करा. आपण सर्वजण एकत्रितपणे कोविड-19 विरुद्धचे युध्द जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

भारताने जानेवारी 2020 पासून कोविड - 19 चाचणी संदर्भातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दर्शवली आहे. देशातील चाचणी क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. दररोज 15 लाखाहून अधिक नमुने तपासले जात आहेत.

दर दिवशी दशलक्ष लोकसंख्येमागे 140 चाचण्या करण्याच्या डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार यामध्ये भारताने लक्षणीय कामगिरी बजावली आहे. “कोविड - 19 च्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य व सामाजिक उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य निकष” या संबंधीच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये डब्ल्यूएचओने संशयित प्रकरणांच्या व्यापक देखरेखीसाठी या धोरणाचा सल्ला दिला आहे.

35 राज्य/केंद्रशासित प्रदेशात प्रति दिवशी दर दहा लाख लोकसंख्येमागे 140 हून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. राष्ट्रीय सरासरीनुसार प्रति दिवशी दर दहा लाख लोकसंख्येमागे 865 चाचण्या होत आहेत.

गेल्या 24 तासात देशात सुमारे 12 लाख चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 11,94,321 चाचण्या करण्यात आल्या असून एकूण चाचण्यांची संख्या 8.34 कोटी (8,34,65,975) इतकी झाली आहे.

मोठ्या प्रमाणावर चाचणी केल्याने पॉझिटीव्हीटी दरात घट होण्यास मदत झाली आहे, हे पुराव्याने सिद्ध झाले आहे. राष्ट्रीय स्तरावर एकूण पॉझिटीव्हीटी दरात तीव्र घट झाल्याने कोविड संक्रमणाच्या प्रसाराचे प्रमाण कमी झाल्याचे सिद्ध झाले आहे.

जास्तीत जास्त चाचण्या केल्यामुळे बाधित रुग्णांची लवकर ओळख, त्यांच्यावर पाळत ठेवणे व ट्रेसिंगद्वारे त्वरित तपासणी करणे आणि गंभीर स्वरुपाच्या घटनांमध्ये घरे / रुग्णालयात वेळेवर व प्रभावी उपचार केले गेले, परिणामी या उपाययोजनांमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

7 राज्य/केंद्रशासित प्रदेशात पॉझिटीव्हीटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवला गेला आहे. केंद्र सरकारच्या यशस्वी टेस्ट, ट्रॅक, ट्रीटमेंट आणि तंत्रज्ञान धोरणाचा हा परिणाम असून राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी याची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.

22 राज्य/केंद्रशासित प्रदेशात पॉझिटीव्हीटी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. पॉझिटीव्हीटी दर 8.19 टक्के असून त्यात सतत घट होत आहे.

नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असून गेल्या 24 तासात 78,524 नवीन रुग्ण आढळले असून 83,011 रुग्ण बरे झाले आहेत.आतापर्यंत एकूण 58,27,704 रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यातील तफावत 49 लाखांहून (49,25,279) अधिक आहे.

सलग 17 व्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमी आहे. सध्या 9,02,425 बाधित रुग्ण असून यापैकी 13.20 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.

मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होऊन तो 85.25 टक्के झाला आहे.

नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण बरे झाले असून एका दिवसात महाराष्ट्रात 16 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात 78,524 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 79 टक्के रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 14 हजार तर त्या खालोखाल कर्नाटकात 11 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात 971 रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 82 टक्के मृत्यू10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, आंध्रप्रदेश, पंजाब, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश यांचा समावेश आहे. 36 टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रातील (355) नोंदवले गेले आहेत.

 

इतर अपडेट्स:

कोविड-19 शी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या लोकचळवळीत सहभागी होण्याचे आवाहन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सर्व नागरिकांना केले. या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे, की ‘कोविड-19 सारख्या जागतिक आजाराचा सामना करायचा असेल तर आपण सर्व देशबांधवांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

कोविड विरुद्धच्या लढाईसंदर्भातील देशव्यापी चळवळीचा भाग म्हणून केंद्र सरकार, केंद्रशासित प्रदेश, मंत्री, विभाग आणि राज्य सरकारांसमवेत नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. प्रदेशनिहाय संपर्कासह विशेषतः कोविड-19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत अशा जिल्ह्यात तिथल्या गरजांनुसार आखलेल्या विशिष्ट संपर्क अभियानांतर्गत नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. आवश्यक ते खबरदारीचे उपाय योग्य अश्या माध्यम, मंचाद्वारे पोहोचवण्यात येतील. प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ होईल अशा सोप्या आणि सुलभ संदेशावर विशेष लक्ष पुरवण्यात येईल असे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या मोहिमे संदर्भात बोलताना सांगितले.

प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा विभाग), पुणे यांनी आज विविध माध्यमातून जनजागृती कार्यक्रमांना सुरुवात केली. पॉडकास्ट, जिंगल्स, चित्रकला व घोषणा स्पर्धा या माध्यमातून ‘कोविड योग्य वर्तन’ विषयी लोकजागर करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या, पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई यांच्या हस्ते या सर्व कार्यक्रमांचे औपचारिक प्रकाशन/उद्घाटन आज आभासी पद्धतीने करण्यात आले.

 

महाराष्ट्र अपडेट्स

राज्यात 15 ऑक्टोबरला शाळा सुरू करण्याऐवजी दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी चर्चा केली. महाराष्ट्रातील रेस्टॉरंट्स आणि बारना सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत किंवा महापालिका आयुक्त वा जिल्हा प्रशासन यांच्या निर्देशानुसार खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थांना पाठवलेल्या पत्रात सरकारने हे कळविले आहे. राज्यातील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार यांना कमाल 50 टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार 5 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यात 14,578 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर 16, 715 रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 11,96,441 इतकी झाली आहे.

FACT CHECK

 

Image

*****

B.Gokhale/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1662855) Visitor Counter : 206