गृह मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोविड-19 विरुद्धच्या लोकचळवळीत सर्वांनी सहभागी होण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आवाहन सगळे देशबांधव एकत्रित आले तरच कोविड-19 सारख्या जागतिक आजाराचा सामना होऊ शकेल


आपण सर्वांनी एकत्र येऊन, कोविडशी लढा देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या मोहिमेत सहभागी होऊया-अमित शाह
“स्वतःचे कोविडपासून संरक्षण करण्यासाठी केवळ तीन मंत्र आहेत-मास्कचा वापर, दोन मीटरचे शारीरिक अंतर आणि वारंवार हात स्वच्छ धुणे”

कोविड-19 पासून केवळ स्वतःलाच नव्हे तर आपले मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी या तीन सुरक्षा मंत्रांचे पालन आपण सर्वांनी करुया

Posted On: 08 OCT 2020 5:06PM by PIB Mumbai

 

कोविड-19 शी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या लोकचळवळीत सहभागी होण्याचे आवाहन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सर्व नागरिकांना केले.

या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे, की कोविड-19 सारख्या जागतिक आजाराचा सामना करायचा असेल तर आपण सर्व देशबांधवांनी एकत्र येणे आवश्यक आहे. चला तर मग, आपण सगळे लोक पंतप्रधानांच्या जनचळवळीत सहभागी होऊया, प्रत्येक व्यक्तीला या  आजाराविषयी आणि त्यापासून बचाव करण्याविषयी माहिती देऊन, भारताला कोविड मुक्त करुया.

ते पुढे म्हणाले, “कोविडपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठीचे केवळ तीन मंत्र आहेत. मास्कचा वापर, दोन मीटरचे शारीरिक अंतर राखणे, हात वारंवार धुणे. या तीन मंत्रांचे पालन करूया आणि  केवळ स्वतःलाच नव्हे तर, आपले कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांनाही कोविड संसर्गापासून सुरक्षित ठेवूया,” असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना से बचाव के केवल तीन मंत्र;

मास्क पहनें।

दो गज की दूरी रखें।

बार-बार हाथ धोएं।

सभी से मेरी अपील है कि @narendramodi जी के इस आवाहन को सुरक्षा मंत्र मानकर न सिर्फ स्वयं को सुरक्षित रखें बल्कि अपने परिजनों, दोस्तों और सहकर्मियों को भी सुरक्षित करें। #Unite2FightCorona pic.twitter.com/2XqGcoUoZb

— Amit Shah (@AmitShah) October 8, 2020

कोरोना जैसी वैश्विक महामारी से तभी लड़ा जा सकता है जब समस्त देशवासी एक साथ आयें।

आइए हम सब मिलकर @narendramodi जी द्वारा कोरोना के विरुद्ध चलाए जा रहे इस जनआंदोलन से जुड़े और सभी को इस महामारी के प्रति जागरूक कर कोरोना मुक्त भारत बनाने में एक अहम भूमिका निभाए।#Unite2FightCorona pic.twitter.com/vBvHNUxJ5t

— Amit Shah (@AmitShah) October 8, 2020

*****

M.Chopade/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1662748) Visitor Counter : 179