आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 83% पेक्षा अधिक
बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रीय रुग्णांपेक्षा 41.5 लाखांहून अधिक
Posted On:
29 SEP 2020 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2020
भारतात रुग्ण बरे होण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांतील बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रीय रुग्णांपेक्षा अधिक आहे. आज भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर 83% पेक्षा अधिक होता.
गेल्या 24 तासांत 84,877 रुग्ण बरे झाले आहेत, तर सक्रीय रुग्णांची संख्या 70,589 एवढी आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 51,01,397 एवढी आहे.
बरे झालेल्या रुग्णांतील 73% रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली, ओदिशा, केरळ, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या दहा राज्यांतील आहेत.
रुग्ण बरे होण्याच्या संख्येत 20,000 बरे झालेल्या रुग्णांसह महाराष्ट्र आघाडीवर आहे, तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात 7,000 प्रति दिन असे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आहे.

बरे होणाऱ्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सक्रीय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यातील अंतर बरेच वाढले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या (9,47,576) सक्रीय रुग्णांपेक्षा 41.5 लाखाने (41,53,831) अधिक आहे. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण सक्रीय रुग्णांपेक्षा 5.38 पटीने अधिक आहे, ज्यातून बरे झालेल्या रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे हे दिसते.
देशातील सक्रीय रुग्णांची संख्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या केवळ 15.42% आहे आणि यात सातत्याने घट होत आहे.
खालील दोन आलेखाच्या माध्यमातून 23 आणि 29 सप्टेंबरदरम्यान दहा राज्यांतील सक्रीय रुग्णांच्या बदलत्या संख्येची परिस्थिती लक्षात येईल.

देशात गेल्या 24 तासांत 70,589 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
10 राज्ये/कें.प्रदेशांमध्ये एकूण रुग्णसंख्येच्या 73% नवीन कन्फर्मड रुग्णसंख्या आहे.

यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात 11,000 तर कर्नाटकात 6,000 रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत 776 मृत्यूंची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत झालेल्या मृत्यूपैकी 78% मृत्यू 10 राज्ये/कें.प्रदेशांमध्ये झाले आहेत.

महाराष्ट्रात 23% मृत्यू म्हणजेच 180 मृत्यू तर तामिळनाडूमध्ये 70 मृत्यूंची नोंद झाली आहे.

* * *
S.Rai/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660587)
Visitor Counter : 221
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada