उपराष्ट्रपती कार्यालय

प्रसिद्ध पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त

प्रविष्टि तिथि: 25 SEP 2020 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2020


उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी, प्रसिद्ध पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

एस पी बालसुब्रमण्यम यांच्याशी आपली अनेक वर्षांची ओळख असून त्यांच्या निधनाने धक्का बसला. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने संगीत जगताची अपरिमित हानी झाली आहे. एसपीबी किंवा बालू या नावाने त्यांच्या चाहत्यांमध्ये परिचित असलेले बालसुब्रमण्यम हे नेल्लोर या आपल्या मूळ गावातून आल्याचे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. त्यांच्या सुरेल धून, मातृभाषेप्रती त्यांचे प्रेम, युवा गुणवान संगीतकारांना त्यांनी दिलेले असामान्य मार्गदर्शन याबद्दल आपल्याला नेहमीच कौतुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुर्दैवाने या विषाणूमुळे बालसुब्रमण्यम आपल्यात नसले तरी त्यांची गाणी मात्र सदैव आपल्यासमवेत राहतील. त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतानाच त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सोसण्याचे बळ देण्याची प्रार्थना ईश्वराकडे आपण करत असल्याचे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.

 

* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1659053) आगंतुक पटल : 273
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu , Kannada , Malayalam