PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
14 SEP 2020 7:30PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 14 सप्टेंबर 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
देशातील सर्व भाषांना समान सन्मान द्यायला हवा, मात्र, कुठेही कोणत्याही भाषेचे सक्ती केली जाऊ नये अथवा तिला विरोधही केला जाऊ नये, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.
हिंदी दिवस-2020 निमित्त ‘मधुबन एज्युकेशनल बुक्स’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. आपल्या सर्व भारतीय भाषांना समृद्ध इतिहास आणि परंपरा असून आपल्याला भाषिक वैविध्याचा तसेच सांस्कृतिक वारशाचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा, असे श्री नायडू यावेळी म्हणाले
एका विशिष्ट वातावरणात संसदेचे हे अधिवेशन आज सुरु होत आहे. कोरोनाही पण त्याचवेळी कर्तव्येही आहेत. आणि सर्व खासदारांनी कर्तव्याचा मार्ग निवडला आहे. मी सर्व खासदारांचे, त्यांच्या या पुढाकारासाठी अभिनंदन करतो, आणि त्यांना धन्यवादही देतो.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज लोकसभा / राज्यसभेत कोविड महामारी आणि केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत स्वतःहून दिलेल्या निवेदनाचा पूर्ण मजकूर येथे पाहता येईल.
- कोरोनातून रुग्ण लवकर बरे होण्याच्या प्रवासात भारताने आज नवा टप्पा गाठला. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा देशाचा आलेख चढता असून हा दर 78 % पर्यंत पोहोचला आहे. दररोज बरे होणाऱ्यांची वाढती संख्या यातून प्रतीत होत आहे. गेल्या 24 तासात 77,512 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या आता 37,80,107 झाली आहे. बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यातले अंतर सातत्याने वाढत असून आज हे अंतर सुमारे 28 लाख (27,93,509) झाले आहे.
इतर अपडेट्स:
1. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, 2020
2. 2020 शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी आणि कृषी सेवा करार विधेयक, 2020
3. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, 2020
महाराष्ट्र अपडेट्स :
मुंबईत कोविड-19 च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे, चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने म्हटले आहे. बीएमसीने म्हटले की, 'मिशन बिगिन अगेन' चा 4 था टप्पा आणि या महिन्याच्या सुरूवातीस पार पडलेल्या 10- दिवसाच्या गणेशोत्सवामुळे निर्बंध शिथील केल्यामुळे संक्रमणाचे प्रमाण वाढत गेले. सद्यस्थितीत मुंबई जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 77 टक्के आहे आणि आठवडाभरात रुग्णसंख्येत 1.24 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 30,316 सक्रीय रुग्ण आणि गेल्या काही दिवसांत दररोज सुमारे 2 कोविड रुग्णांची संख्या नोंदवली जात आहे, यामुळे मुंबई देशातील सर्वात प्रभावित शहरांपैकी एक बनले आहे.
FACT CHECK
********
R.Tidake/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1654181)
Visitor Counter : 224