संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्र्यांनी एरो इंडिया -21च्या संकेतस्थळाचे केले उद्घाटन
आशियातील सर्वात मोठ्या उड्डाण प्रदर्शनातील स्टाँल्स आरक्षणाला सुरुवात
Posted On:
11 SEP 2020 1:21PM by PIB Mumbai
कर्नाटकातील बंगळुरू येथील येलहंका वायूदलाच्या स्थानकावर दिनांक 3 ते 7 फेब्रुवारी 2021 दरम्यान 13 वे "एरो इंडिया 2021 "प्रदर्शन भरणार आहे. संरक्षण मंत्री श्री.राजनाथ सिंह यांनी या प्रदर्शनाच्या https://aeroindia.gov.in या संकेतस्थळाचे नवीदिल्ली येथे उद्घाटन करून त्यांच्या स्टाँल्स आरक्षणाला सुरुवात केली.
एरो इंडिया 2021 संकेतस्थळावर आशियातील सर्वात मोठ्या उड्डाण क्षेत्रातील प्रदर्शनासाठी संपर्करहीत ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून यावर प्रदर्शनात भाग घेणारे आणि प्रदर्शनास भेट देणारे, या सर्वांच्या आतिथ्याबद्दल माहिती असेल तसेच संरक्षण मंत्रालयाची वर्तमान धोरणे, नव्या योजना, स्वदेशी बनावटीची विमाने आणि हेलिकॉप्टर्स ईत्यादी विषयीची माहीती असेल. संरक्षण मंत्र्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी याप्रमाणे प्रदर्शनात भाग घेणारे आपली नोंदणी, आरक्षण तसेच त्याचे सर्व शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरू शकतील. दिनांक 31आँक्टोबर 2020 च्या आधी प्रदर्शनात नाव नोंदणी करणाऱ्यांना विशेष सवलतींचा लाभ घेता येईल.
प्रदर्शनात सहभागी व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना दिनांक 3 ते 7 फेब्रुवारी 2021 यादरम्यान, जागा आरक्षित करण्यासाठी आपली तिकिटे संकेतस्थळावरून आँनलाईन पध्दतीने खरेदी करु शकतील.ज्या माध्यमांना आपल्या प्रकाशनांतून याचा प्रसार करायचा असेल अथवा माध्यम प्रतिनिधी हेसुद्धा संकेतस्थळावर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यासाठी आपले नाव नोंदवू शकतात.या संकेतस्थळावर, शंका निरसन आणि अभिप्राय यंत्रणा देखील कार्यरत असून प्रदर्शनकारी आणि अभ्यागत यासंबंधी आपले प्रश्न/टिप्पणी या संकेतस्थळावर पाठवू शकतील.आरोग्य शिष्टाचार उपलब्ध करत हा कार्यक्रम सुरक्षितपणे केला जाईल.
हे संकेतस्थळ परस्पर संवाद साधणारे असेल आणि या प्रदर्शनाचा हेतू,अनेक संपर्करहीत अनुभवांपैकी पहिला अनुभव ,अभ्यागतांना घेऊन देणे हा आहे आणि त्यामुळे सहभागी होणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि सहभागी सदस्यांना, या महामारीच्या काळातही मार्गदर्शक सूचना आणि तत्वांशी,हा कार्यक्रम अनुरूप आहे याची जाणीव होईल.
संरक्षण मंत्री श्री .राजनाथ सिंह यांनी आपल्या अलिकडच्या रशिया दौऱ्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेवेळी ,रशियातील आणि मध्य आशियन प्रजासत्ताक देशातील संरक्षण मंत्री आणि उद्योग प्रतिनिधींना, एरो इंडिया -21प्रदर्शनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते.
संरक्षण सचिव(संरक्षण सामुग्री) श्री.राज कुमार आणि संरक्षण मंत्रालयातील इतर वरीष्ठ अधिकारी या संकेतस्थळाच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.
****
B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653402)
Visitor Counter : 156
Read this release in:
Malayalam
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Telugu