आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 चाचण्यांमध्ये भारताने पुन्हा नवीन उच्चांक गाठला
गेल्या 24 तासात 11.5 लाखांहून अधिक चाचण्या
Posted On:
09 SEP 2020 3:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2020
एका दिवसात सर्वाधिक, जवळपास 75,000 कोविडचे रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली असतानाच, त्याच दिवशी दुसरीकडे सर्वाधिक कोविड-19 चाचण्या करण्याचा विक्रम देखील घडला आहे. गेल्या 24 तासांत 11.5 लाखाहून अधिक कोविड नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.
भारत हा अशा काही देशांपैकी एक आहे जिथे दैनंदिन चाचणी संख्या सर्वाधिक आहे. दैनंदिन चाचणी क्षमता 11 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 11,54,549 चाचण्या घेण्यात आल्या असून भारताने राष्ट्रीय निदान क्षमता आणखी बळकट केली आहे.
या कामगिरीमुळे एकत्रित चाचण्यांचा आकडा 5.18 कोटींच्या पुढे गेला आहे. (5,18,04,677)
मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या देशव्यापी चाचण्यांमुळे, वेळेवर निदान होत असल्याने रुग्णांना योग्य उपचारांसाठी अचूक वेळी अलगीकरण किंवा रुग्णालयात दाखल केले जात आहेत. यामुळे मृत्यू दर (आज 1.69%) कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
विस्तारीत नैदानिक प्रयोगशाळांचे नेटवर्क आणि विविध उपायांद्वारे देशभरात सुलभ चाचणीच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. या कामगिरीवर आधारित, प्रति दशलक्ष चाचण्यांमध्ये (टीपीएम) वाढ होऊन ती 37,539 झाली आहे.
जानेवारी 2020 मध्ये पुण्यात केवळ एक चाचणी प्रयोगशाळा होती; देशातील चाचणी प्रयोगशाळांचे नेटवर्क निरंतर बळकट होत असून आज देशात 1678 प्रयोगशाळा आहेत, त्यात सरकारी क्षेत्रातील 1040 आणि खाजगी क्षेत्रातील 638 प्रयोगशाळा आहेत. यामध्ये:
- रिअल-टाइम आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 854 (सरकारी 469 + खासगी: 385)
- ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 703 (सरकारी : 537 + खाजगी: 166)
- सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा :121 (सरकारी: 34 + खासगी: 87)
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1652630)
Visitor Counter : 201
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu