राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती कोविंद यांनी शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले
कोविड काळात शिक्षकांनी दिलेल्या डिजिटल शिक्षणाचे कौतुक केले
मुलांना भविष्यातील गरजांसाठी तयार करणारे राष्ट्रीय शिक्षण धोरण
Posted On:
05 SEP 2020 4:19PM by PIB Mumbai
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (5 सप्टेंबर, 2020) शिक्षक दिनानिमित्त आभासी पद्धतीने संपन्न झालेल्या पहिल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात देशभरातील 47 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात पुरस्कारप्राप्त विजेत्यांचे अभिनंदन केले आणि शालेय शिक्षण गुणात्मकरित्या सुधारण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांपैकी जवळपास 40 टक्के विजेत्या महिला होत्या आणि शिक्षक म्हणून त्यांनी बजावलेल्या भूमिकेचे राष्ट्रपतींनी कौतुक केले.
डॉ. एस. राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण करत राष्ट्रपती कोविंद म्हणाले की ते एक दूरदर्शी, मुत्सदी आणि सर्वात उल्लेखनीय म्हणजे एक असामान्य शिक्षक होते. डॉ. एस. राधाकृष्णन देशाच्या विकासासाठी केलेल्या सेवांचा आणि देशातील सगळ्या शिक्षकांच्या प्रती आदर दर्शविण्यासाठी राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो असे ते म्हणाले. आजचा हा दिवस आपल्या शिक्षकांच्या वचनबद्धतेबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी देखील प्रदान करतो. हीच बांधिलकी कोणत्याही शाळेची पायाभरणी आहे कारण शिक्षक हेच खरे राष्ट्र निर्माते आहेत जे मुलांचे चरित्र आणि ज्ञान उभारणीत मोलाचे काम करतात असे ते पुढे म्हणाले.
कोविड साथीच्या आजाराच्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले की आमचे शिक्षक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत. या नवीन तंत्रज्ञान आधारित अध्यापन पद्धतीनुसार स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या शिक्षकांच्या कौशल्याचे कौतुक करताना कोविंद म्हणाले की, शिक्षणाला अधिक प्रभावी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे संभाषण करण्यास सक्षम बनविण्यासाठी सर्व शिक्षकांनी डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील त्याचे कौशल्य “सुधारित आणि अद्ययावत” करणे महत्वाचे आहे. राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे पालकांनी शिक्षकांशी एकत्रित येऊन मुलांना या नवीन क्षेत्रांमध्ये रुची निर्माण करण्यास प्रोत्साहित केले आहे. डिजिटल विभाजनाकडे लक्ष वेधत त्यांनी आदिवासी व दुर्गम भागातील मुलांनाही याचा फायदा व्हावा म्हणून पावले उचलायला हवीत, यावर भर दिला.
नवीन शिक्षण धोरण आमच्या मुलांना भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम करेल आणि विविध भागधारकांच्या मतांचा विचार केल्या नंतरच या धोरणाची आखणी करण्यात आली आहे असे राष्ट्रपती म्हणाले. हे धोरण आता यशस्वी व फलदायी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी शिक्षकांची असेल, असेही ते म्हणाले. शिक्षकांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यास सक्षम बनविण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत आणि शिक्षण क्षेत्रासाठी सर्वोत्कृष्टांची निवड केली जाईल, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी स्वागतपर भाषण केले तर शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आभार प्रदर्शन केले.
राष्ट्रपतींचा संदेश हिंदीमध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा
***
B.Gokhale/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651604)
Visitor Counter : 214
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam