आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचा भारताचा नवा उच्चांक

गेल्या 24 तासात 68,584 रुग्ण बरे झाले

26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70% पेक्षा जास्त

गेल्या 24 तासांत 11.7 लाखाहून अधिक लोकांच्या चाचण्या करीत भारताने यशाचे आणखी एक शिखर गाठले

Posted On: 03 SEP 2020 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  3 सप्टेंबर  2020

 

एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक भारताने नोंदविला आहे. गेल्या 24 तासांत कोविड -19 चे 68,584 रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत जवळपास 30 लाख (2,970,492) वाढ झाली आहे.

यामुळे, कोविड -19 मधून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 77% पेक्षा (77.09%) अधिक झाले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या संख्येपेक्षा (8,15,538) 21.5 लाखांनी जास्त झाली आहे.

आजमितीस बरे झालेले रूग्ण सक्रिय  पेक्षा 3.6 पटीहून अधिक वाढले आहेत. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाने विक्रमी पातळी गाठल्याने सक्रीय रुग्णांमध्ये घट झाली आहे आणि सध्याच्या एकूण प्रकारणांपैकी केवळ 21.16 %च सक्रिय आहेत.

रुग्णालयांमधील सुधारित आणि प्रभावी नैदानिक उपचार, गृह अलगीकरणाचे पर्यवेक्षण, ऑक्सिजन समर्थन, रुग्णांना तातडीने आणि वेळेवर उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सुधारित सेवा, कोविड -19 रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नैदानिक व्यवस्थापन कौशल्यांच्या वृद्धीसाठी नवी दिल्लीच्या एम्सद्वारे, दूरस्थ सल्लागार सत्रांद्वारे तांत्रिक मार्गदर्शन, स्टिरॉइड्स आणि रक्ताच्या गुठळ्या थांबवणारी औषधे इत्यादींचा एकत्रित परिणाम म्हणून अखंड कार्यक्षम रुग्ण व्यवस्थापन केले गेले.

या उपाययोजनांद्वारे भारतातील कोविडने होणारा मृत्यु दर (सीएफआर) जागतिक सरासरीच्या (3.3%) खाली राखला गेला आहे. या मृत्युदरात दररोज घट होत असून तो आज 1.75% वर आहे.

कोविड -19 शी संबंधित सर्व  तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1651016) Visitor Counter : 258