पंतप्रधान कार्यालय

मिशन कर्मयोगीमुळे सरकारमधील मनुष्यबळ व्यवस्थापनात मुलभूत सुधारणा घडून येणार : पंतप्रधान


एकात्मिक शासकीय ऑनलाईन प्रशिक्षण (iGOT) प्लॅटफॉर्ममुळे परिवर्तन होऊन भूमिका-आधारीत मनुष्यबळ व्यवस्थापन आणि निरंतर शिक्षण  होईल प्रदान

Posted On: 02 SEP 2020 9:24PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीट संदेशात म्हणाले, मिशन कर्मयोगी-नागरी सेवा क्षमता वृद्धींगत कार्यक्रमामुळे सरकारमधील मनुष्यबळ व्यवस्थापनात मुलभूत परिवर्तन घडून येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविण्यासाठी हे प्रमाणित आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा वापर करेल.

पंतप्रधान म्हणाले, एकात्मिक शासकीय ऑनलाईन प्रशिक्षण (iGOT) प्लॅटफॉर्ममुळे परिवर्तन होऊन भूमिका-आधारीत मनुष्यबळ व्यवस्थापन आणि निरंतर शिक्षण प्रदान होईल. मिशन कर्मयोगीचे उद्दिष्ट पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना अधिक सर्जनशील, विधायक आणि नाविन्यपूर्ण बनवून भविष्यातील कर्मचारी तयार करणे आहे.

 

#MissionKarmayogi - National Program for Civil Services Capacity Building approved in today’s cabinet will radically improve the Human Resource management practices in the Government. It will use scale & state of the art infrastructure to augment the capacity of Civil Servants. pic.twitter.com/RNl3uDS7IL

— Narendra Modi (@narendramodi) September 2, 2020

The iGOT platform will enable the transition to a role-based HR management & continuous learning. Mission Karmayogi aims to prepare Civil Servants for the future by making them more creative, constructive & innovative through transparency and technology. #CivilService4NewIndia pic.twitter.com/NxGBcAxUGo

— Narendra Modi (@narendramodi) September 2, 2020

***

B.Gokhale/ S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1650813) Visitor Counter : 238