मंत्रिमंडळ
भूविज्ञान आणि खनिज संसाधनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि फिनलँड यांच्यातील परस्पर सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
02 SEP 2020 6:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत भूविज्ञान आणि खनिज संसाधनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी खाण मंत्रालय, भारत सरकार आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, फिनलँड, रोजगार आणि अर्थमंत्रालय फिनलँड सरकार यांच्यातील परस्पर सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
परस्पर सामंजस्य करारामुळे भूविज्ञान, प्रशिक्षण, खनिज पूर्वानुमान आणि योग्यता विश्लेषण, 3/4 डी मॉडेलिंग, दोन संघटनांमधील वैज्ञानिक दुवे मजबूत आणि दृढ करण्याच्या उद्देशाने भूकंप आणि अन्य भौगोलिक सर्वेक्षणांना अंतिम रूप देण्यात येईल.
परस्पर सामंजस्य कराराचा उद्देश परस्पर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय लाभासाठी भाग घेणार्या भूगर्भशास्त्र आणि खनिज स्रोताच्या क्षेत्रातील सहकार्यास चालना देण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी आराखडा तयार करुन व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा आहे. तसेच भूविज्ञान आणि खनिज स्रोतांच्या क्षेत्रात संशोधन आणि खाणींना चालना देण्यासाठी भौगोलिक माहिती व्यवस्थापन आणि माहितीच्या अनुभवाची देवाणघेवाण करण्यात येणार आहे.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) ही राष्ट्रीय भौगोलिक माहिती आणि खनिज स्रोत मूल्यांकन निर्धारण आणि अद्ययावत करणारी आंतरराष्ट्रीय ख्यातीची भारत सरकारची एक प्रमुख भू-वैज्ञानिक संस्था आहे. भू-सर्वेक्षण, हवाई आणि सागरी सर्वेक्षण, खनन आणि तपास, बहु-शाखीय भू-वैज्ञानिक, भू-तांत्रिक, भौगोलिक-पर्यावरण आणि नैसर्गिक संकटांचा अभ्यास, हिमनदी, भूकंपाचा अभ्यास आणि मूलभूत संशोधनातून ही उद्दिष्टे साध्य केली जातात.
फिनलँडचा भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग हा मल्टी-थीमॅटिक डेटा एकत्रीकरण आणि 3/4D मॉडेलिंगच्य माध्यमातून विविध प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खनिज विश्लेषण, जोखीम व्यवस्थापन, पर्यावरण परिणाम मुल्यांकन आणि इतर सामाजिक-आर्थिक महत्वाच्या क्षेत्रात निपूण आहे. तसेच जीआयएस आधारित मॉडेलिंगचे किमान ज्ञान असलेल्या वापरकर्त्यांकडून वापरल्या जाणाऱ्या निर्णय समर्थन प्रणाली विकसित करण्यातही कौशल्य प्राप्त आहे.
***
B.Gokhale/ S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650684)
Visitor Counter : 299
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam