गृह मंत्रालय
माजी राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या स्मृतिनिमित्त सात दिवसाचा राष्ट्रीय शोक
Posted On:
31 AUG 2020 8:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020
केंद्र सरकार प्रचंड दुःखाने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पीटल, नवी दिल्ली येथे 31 ऑगस्ट 2020 रोजी निधन झाल्याचे जाहीर करत आहे.
दिवंगत मान्यवरांच्या सन्मानार्थ, 31 ऑगस्ट 2020 ते 06 सप्टेंबर 2020 असा सात दिवसाचा शासकीय शोक देशभर पाळण्यात येईल. देशभरातील इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल, मनोरंजनाचा कोणताही शासकीय कार्यक्रम होणार नाही.
शासकीय इतमामात करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्काराची तारीख आणि वेळ नंतर जाहीर करण्यात येईल.
M.Chopade /S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650155)
Visitor Counter : 289
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada