आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
दररोज सरासरी 8 लाखांपेक्षा अधिक चाचण्या, देशात कोविड-19 चाचण्यांमध्ये वाढ
प्रति दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 27,000 पेक्षा अधिक
Posted On:
26 AUG 2020 3:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2020
व्यापक चाचण्यांच्या माध्यमातून वेळीच कोविड-19 संक्रमणाचे निदान याची भारतातील संक्रमणाविरोधातील रणनितीमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. केंद्र सरकारच्या ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ धोरणानूसार राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे देशात दररोज 10 लाख चाचण्यांची क्षमता निर्माण झाली आहे.
गेल्या 7 दिवसांतील चाचण्यांची संख्या ही केंद्र आणि राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रदेशांचे या दिशेने असलेले निर्धारित, केंद्रित, सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्न दर्शवते. आतापर्यंतच्या एकूण चाचण्यांची संख्या 3,76,51,512 एवढी आहे. तर, गेल्या 24 तासांत 8,23,992 चाचण्या करण्यात आल्या आहेत. सातत्यपूर्ण चाचण्यांमुळे लवकर निदान होते. लवकर निदान झाल्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांचे अलगीकरण किंवा रुग्णालयात दाखल करण्याची संधी मिळते. यामुळे मृत्यूदर कमी होत आहे.
विस्तारित प्रयोगशाळा नेटवर्क आणि देशभरात सुलभ चाचणीसाठीच्या सुविधांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. यामुळेच प्रति दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण (TPM) वाढून 27,284 एवढे झाले आहे. यात सातत्याने वृद्धी होत आहे.
भारतातील चाचणी प्रयोगशाळांचे जाळे सातत्याने विस्तारत आहे, सध्या 1540 प्रयोगशाळा आहेत. 992 प्रयोगशाळा या सरकारी क्षेत्रात आणि 548 प्रयोगशाळा खासगी क्षेत्रात आहेत. यामध्ये:
- रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 790 : (शासकीय : 460 + खासगी : 330)
- ट्रू नॅट आधारित चाचणी चाचणी प्रयोगशाळा 632 : (शासकीय : 498 + खासगी 134)
- सीबीएनएएटी आधारित प्रयोगशाळा : 118 (शासकीय : 34 + खासगी : 84)
कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
* * *
M.Chopade/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1648714)
Visitor Counter : 200
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam