PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 10 AUG 2020 7:22PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 10 ऑगस्ट 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांना मुख्य भूमीशी जोडणाऱ्या सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलचे (समुद्र तळाशी टाकलेली केबल) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन करून हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण केला. या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांकडून 30 डिसेंबर 2018 रोजी पोर्ट ब्लेअर येथे करण्यात आली होती. या कनेक्टिव्हीटीमुळे आता बेटावर अनेक अमर्याद संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. 2300 किलोमीटर्स सबमरीन केबल टाकण्याचे उद्दिष्ट ठेवणे आणि काम नियोजित लक्ष्याच्याआधीच पूर्ण करणे हे स्तुत्य असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

 

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स :

कोरोना संक्रमणाच्या पाच महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात रविवारी सर्वाधिक 390 मृत्यूंची नोंद झाली, तसेच सलग दुसऱ्या दिवशी राज्यात 12,000 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 17,757 एवढी झाली आहे. तर, 12,248  नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 5.15 लाख झाली आहे. असे असले तरी, दिलासादायक बाब म्हणजे, नोंद झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. रविवारी, 13,348 रुग्णांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली, यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3,51,710 एवढी झाली आहे. 

 

 

***

M.C/S.T/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644890) Visitor Counter : 244