आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरोग्य मंत्रालयाने सुरु केलेल्या  ई संजीवनी हा टेली-मेडिसिन प्लॅटफॉर्म लोकप्रिय करण्यात राज्यांच्या दिलेल्या योगदानाची डॉ. हर्ष वर्धन यांनी केली प्रशंसा


‘ईसंजीवनी’ आणि ‘ईसंजीवनीओपीडी’च्या माध्यमातून 1.5 लाख दूरध्वनी-सल्लामसलती पूर्ण

Posted On: 09 AUG 2020 9:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य/केंद्रशासित प्रदेशांबरोबर ईसंजीवनीआणि ईसंजीवनीओपीडीप्लॅटफॉर्म संबंधी  आढावा बैठक झाली. टेलि -मेडिसिन सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर 1.5 लाख दूरध्वनी-सल्लामसलती  पूर्ण झाल्या.  आरोग्य आणि कुटुंब कल्याण  राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, हे देखील उपस्थित होते. तामिळनाडूचे आरोग्यमंत्री डॉ.सी.विजय बास्कर वर्च्युअली सहभागी झाले.

नोव्हेंबर 2019 पासून अगदी कमी कालावधीत, ईसंजीवनी आणि  ईसंजीवनीओपीडीकडून दूरध्वनीद्वारे सल्लामसलत  23 राज्यांनी (ज्यांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या  75% आहे) ने लागू केली आहे आणि इतर राज्ये ती सुरु करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

महत्त्वाची कामगिरी म्हणजे  राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवेने 1,50,000 हून अधिक दूरध्वनी-सल्लामसलत पूर्ण केल्या आहेत ज्यामुळे रूग्णांना त्यांच्या घरामधून  डॉक्टरांचा सल्ला घेता येतो, तसेच डॉक्टर देखील अन्य डॉक्टरांशी विचारविनिमय करू शकतात .

या कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त करताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, “पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आयुष्मान भारत - आरोग्य आणि कल्याण केंद्रांवर ब्रॉडबँड आणि मोबाइल फोनच्या माध्यमातून डिजिटल इंडियाची कल्पना लागू केली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने आणि नि: स्वार्थ आणि प्रतिभावान वैद्यकीय व्यावसायिक आणि तज्ञ  यांच्या सहाय्याने आम्ही ईसंजीवनी सारख्या टेली -मेडिसिन व्यासपीठाच्या माध्यमातून आरोग्य सेवा देऊ शकलो आहोत. कोविड साथीच्या आजारा दरम्यान यामुळे आपल्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.

अशाच भावना व्यक्त  करत अश्विनी के. चौबे म्हणाले की ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागातील वैद्यकीय तज्ज्ञांची सहज सुविधा उपलब्ध नसलेल्यांसाठी हे परिवर्तनात्मक ठरणार आहे."

या ईसंजीवनी प्लॅटफॉर्ममुळे दोन प्रकारच्या टेलिमेडिसिन सेवा सक्षम केल्या आहेत.- डॉक्टर-ते-डॉक्टर (ईसंजीवनी) आणि रुग्ण-ते-डॉक्टर (ईसंजीवनी ओपीडी) दूरध्वनी-सल्लामसलत. ईसंजीवनीची  आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र  (एबी-एचडब्ल्यूसी) कार्यक्रमांतर्गत अंमलबजावणी केली जात आहे. डिसेंबर 2022 पर्यंत 'हब अँड स्पोक' मॉडेलमधील सर्व 1.5 लाख आरोग्य आणि कल्याण केंद्रात  दूरध्वनी-सल्लामसलत लागू करण्याची योजना आहे. राज्यांनी 'स्पोक्स', म्हणजेच एसएचसी आणि पीएचसीला दूरध्वनी-सल्ला सेवा प्रदान करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयात समर्पित 'हब' स्थापन  केले आहेत. आजपर्यंत, सामुदायिक आरोग्य अधिकारी आणि डॉक्टर यांच्यासह 12,000 जणांना  या राष्ट्रीय ई-प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी प्रशिक्षण दिले गेले आहे. सध्या 10 राज्यात 3,000 हून अधिक आरोग्य आणि कल्याण केंद्राद्वारे टेलिमेडिसिन पुरवले जात आहे.

सध्या सुरू असलेल्या कोविड -19 महामारीमुळे आरोग्य मंत्रालयाने ईसंजीवनीओपीडीच्या माध्यमातून रुग्ण-ते-डॉक्टर टेलिमेडिसिन सक्षम करणारी दुसरी दूरध्वनी-सल्ला सेवा सुरू केली. जवळपास  20  राज्यांमधील नागरिक आता प्रत्यक्ष रुग्णालयात न जाताच डॉक्टरांशी  सल्लामसलत करीत असल्याने ही ई-आरोग्य सेवा वेगाने लोकप्रिय होत आहे. ई-संजीवनीओपीडी येथे सुमारे 2800  डॉक्टरांना प्रशिक्षण दिले गेले आहे आणि  लॉकडाऊन शिथिल झाला असला  तरीही देशभरातील सुमारे 250  डॉक्टर आणि तज्ञ ई-हेल्थ सेवा पुरवत आहेत.  ही सेवा अँड्रॉइड मोबाइल अप्लिकेशन  म्हणून देखील उपलब्ध आहे. यामुळे लोकांना प्रवास न करता आरोग्य सेवा मिळवणे सोयीचे झाले आहे. लॉग इन केल्यानंतर सुमारे पाच मिनिटांत रुग्णाला डॉक्टरांशी संवाद साधता येईल हे सुनिश्चित करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत, देशभरात एकूण 1,58,000  दूरध्वनी-सल्लामसलत करण्यात आल्या आहेत, त्यापैकी 67,000 ई-संजीवनीमार्फत आयुष्मान भारत एचडब्ल्यूसी येथे आणि 91,000 रूग्ण-डॉक्टर सल्लामसलत ई-संजीवनीओपीडी मोडद्वारे केल्या आहेत. सध्या, दररोज सरासरी 5,000 सल्लामसलत (ईसंजीवनी आणि ईसंजीवनीओपीडी) या दोन्ही माध्यमांद्वारे पुरविल्या जातात.

टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म 40 पेक्षा जास्त ऑनलाईन ओपीडी आयोजित करीत आहे, यातील निम्म्याहून अधिक खास ओपीडी आहेत ज्यात स्त्रीरोगविज्ञान मानसोपचार, त्वचाविज्ञान, ईएनटी, नेत्ररोगशास्त्र, एड्स / एचआयव्ही रूग्णांसाठी अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी), असंसर्गजन्य आजार  (एनसीडी) इत्यादींचा समावेश आहे.

तामिळनाडू (32,035 सल्लामसलत), आंध्र प्रदेश (28,960), हिमाचल प्रदेश  (24,527) , उत्तर प्रदेश (20,030), केरळ (15,988), आणि त्यानंतर  गुजरात (7127) , पंजाब (4450), राजस्थान (3548), महाराष्ट्र (3284) आणि उत्तराखंड (2596)हे दहा अव्व्ल राज्ये आहेत ज्यांनी ई-संजीवनी आणि ई-संजीवनीओपीडीच्या माध्यमातून सर्वधिक सल्लामसलती नोंदवल्या आहेत. 

एबी-एचडब्ल्यूसीमध्ये डॉक्टर-ते-डॉक्टर ई-संजीवनी सल्लामसलतातील बहुसंख्य हिस्सा आंध्र प्रदेश (25,478) आणि हिमाचल प्रदेश (23,857) चा आहे तर तमिळनाडू रुग्ण-ते-डॉक्टर ई-संजीवनी ओपीडी सेवांमध्ये 32,035 सल्लामसलतींसह आघाडीवर आहे

राज्यांशी झालेल्या चर्चेत, या ई-आरोग्य सेवांचा  (eSanjeevani and eSanjeevaniOPD platform) वापर करणाऱ्या सर्व राज्यांच्या योगदानाचे कौतुक केले गेले. तमिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी या योजनेत आरोग्य मंत्रालय आणि सी-डॅक यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. टेलि-मेडिसिन प्लॅटफॉर्म व आपल्या ऑनलाईन ओपीडी सेवांद्वारे राज्यातील सर्वोच्च सल्लामसलत (32,035) नोंदविण्याचे कर्तृत्व त्यांनी अधोरेखित केले. चर्चेदरम्यान राज्यांकडून अवलंबलेल्या काही चांगल्या पद्धती सामायिक केल्या गेल्या. आंध्र प्रदेशने सर्व पंचायत / पीएचसीमध्ये ई संजीवनी लागू करण्यास सुरवात केली आहे; हिमाचल प्रदेशने यापूर्वीच ई-ओपीडीद्वारे अनेक खास सेवा प्रदान केल्या आहेत; उत्तर प्रदेशने एक महिन्याच्या अल्प कालावधीत 20,030 सल्लामसलती  नोंदविल्या गेल्या आहेत; केरळने पलक्कड जिल्ह्यातील कारागृहात टेलिमेडिसिन सेवा यशस्वीरित्या राबविली.

राजेश भूषण, केंद्रीय आरोग्य सचिव व मंत्रालयातील अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. डॉ. पी. के. खोसला, कार्यकारी संचालक, सी-डीएसी आणि डॉ. संजय सूद, सहकारी संचालक, सी-डीएसी, आरोग्य सचिव, एमडी एनएचएम आणि आमंत्रित राज्यांमधील अन्य वरिष्ठ अधिकारी डिजिटली सहभागी  झाले.

***

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1644661) Visitor Counter : 299