पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान उद्या कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत आर्थिक सुविधांचा शुभारंभ करणार आणि पीएम-किसान योजनेंतर्गत लाभांचे वितरण करणार
एक लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा निधी, पिक कापणी नंतर पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेती संपत्तीचे व्यवस्थापन करेल
पीएम-किसानच्या सहाव्या हप्त्यांतर्गत 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 17,000 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण
Posted On:
08 AUG 2020 2:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट 2020 ला सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कृषी पायाभूत निधी अंतर्गत 1 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक सुविधांचा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान पीएम-किसान योजनेंतर्गत 8.5 कोटी शेतकऱ्यांना 17,000 कोटी रुपयांचा सहावा हप्त्याच्या निधीचे वितरण देखील करणार आहेत. देशभरातील लाखो शेतकरी, सहकारी संस्था आणि नागरिक हा कार्यक्रम पाहू शकतील. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर हे देखील या वेळी उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाने "कृषी पायाभूत सुविधा निधी" अंतर्गत 1 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय वित्तपुरवठा सुविधा योजनेला मंजुरी दिली होती. हा निधी शीतगृह, संकलन केंद्र, प्रक्रिया युनिट्स यासारखी सामुदायिक शेती मालमत्ता आणि कापणी नंतरचे पायाभूत सुविधा व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरेल. या मालमत्तांमुळे शेतकरी आपल्या शेतमालाची साठवण करून तो नंतर अधिक किंमतीला विकून वर्धित मूल्य प्राप्त करू शकेल. अनेक कर्ज देणार्या संस्थांच्या भागीदारीत वित्त सुविधेअंतर्गत 1 लाख कोटी रुपये मंजूर केले जातील; सार्वजनिक क्षेत्रातील 12 पैकी 11 बँकांनी डीएसी आणि एफडब्ल्यू सह आधीच सामंजस्य करार केले आहेत. या प्रकल्पांची व्यवहार्यता वाढविण्यासाठी लाभार्थ्यांना 3% व्याज सवलत आणि 2 कोटी रुपयांपर्यंतची पत हमी दिली जाईल. या योजनेच्या लाभार्थींमध्ये शेतकरी, पीएसीएस, विपणन सहकारी संस्था, एफपीओ, बचत गट, संयुक्त दायित्व गट (जेएलजी), बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषि-उद्योजक, स्टार्टअप्स आणि केंद्रीय / राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्पांचा समावेश असेल. .
1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसन) योजनेने 9.9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 75,000 कोटी रुपयांचा थेट रोख लाभ प्रदान केला आहे. या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यात आणि त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यास सक्षम केले आहे. पीएम-किसन योजनेची अंमलबजावणी वेगाने झाली आहे, गळती रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुविधा वाढविण्यासाठी, निधी थेट लाभार्थ्यांच्या आधार अधिकृत बँक खात्यात वर्ग करण्यात आला. लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुमारे 22,000 कोटी जाहीर केल्यामुळे कोविड -19 साथीच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासही ही योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे.
* * *
M.Iyengar/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644360)
Visitor Counter : 338
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam