PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 05 AUG 2020 8:23PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

Text Box: •	India records highest ever single day recoveries of 51,706; Recovery Rate reaches a record high of 67.19%•	Case Fatality Rate further dips to 2.09%.•	India tests more than 6 lakh tests in 24 hours, for 2nd day in a row; More than 2.14 crore samples tested cumulatively.•	Tests Per Million rises to 15568•	Recalling the significance of the path of ‘maryada’ of Shree Ram in the backdrop of the COVID situation, Prime Minister says the current situation demands the maryada to be ‘do gaz ki doori – mask hai zaroori’

दिल्ली-मुंबई, 5 ऑगस्ट 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत 'श्री राम जन्मभूमी मंदिरा’चे भूमीपूजन केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी या मंगलक्षणी देशातील नागरिकांचे आणि जगभरातील रामभक्तांचे अभिनंदन केले. आजच्या समारंभाला ऐतिहासिक असे संबोधत ते म्हणाले, भारतासाठी आज एका गौरवशाली अध्यायाची सुरुवात होत आहे, देशभरातील लोकांनी ज्याची शतकानुशतके प्रतीक्षा केली होती, त्या क्षणासाठी लोक उत्साही आणि भावनिक झाले आहेत, काहीजणांना तर हा क्षण आपल्या कारकिर्दीत पाहता आला, यावर क्षणभर विश्वास बसत नसेल. त्यांनी अधोरेखीत केले की, राम जन्मभूमी पुन्हा तुटण्याच्या आणि पुन्हा उभारण्याच्या चक्रातून मुक्त झाली आहे आणि आता मंडपाच्या जागी रामललाचे भव्य मंदिर उभारले जाईल.

पंतप्रधान म्हणाले, 15 ऑगस्ट हा दिवस ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी देशभरातील लोकांनी केलेल्या त्यागाचे प्रतिनिधीत्व आहे, त्याचप्रमाणे हा दिवस राम मंदिरासाठी पिढ्यानपिढ्यांच्या प्रचंड समर्पणाचे आणि अखंड संघर्षाचे प्रतीक आहे. राम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला त्या सर्वांचे पंतप्रधानांनी स्मरण केले आणि त्यांना अभिवादन केले.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

भारतात कोविड विरोधातील लढा अव्याहतपणे सुरु असून गेल्या 24 तासात, सलग दुसऱ्या दिवशी देशात कोविडच्या, 6 लाखांहून जास्त चाचण्या करण्यात आल्या. केंद्र, राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी आक्रमकतेने चाचण्या करणे हा लवकर निदान तसेच कोविड-19 रुग्णांचे उपचार/गृह अलगीकरण करण्यातील पहिला टप्पा मानल्याने चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

श्रेणीबद्ध प्रयत्नांमुळे चाचण्यांचे जाळे योजनाबद्ध रीतीने देशभर वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत 6,19,652 चाचण्या  करण्यात आल्या. त्याबरोबरच आज रोजी चाचण्यांची एकत्रित संख्या 2,14,84,402 इतकी झाली आहे. प्रती लक्ष चाचण्यांच्या संख्येत 15,568 इतकी लक्षणीय वाढ झाली आहे.

‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ या दृष्टीकोणावर आधारित धोरणाअंतर्गत कोविड-19 च्या चाचणी प्रयोगशाळांचे निरंतर सक्षमीकरण करण्यात येत आहे. आज रोजी देशात 1,366 प्रयोगशाळा आहेत, यापैकी 920 सरकारी तर 446 खाजगी प्रयोगशाळा आहेत. यात

रियल टाईम RT PCR आधारित चाचण्यांच्या प्रयोगशाळा: 696 (सरकारी 421 + खाजगी 275)

• TrueNat आधारित चाचण्यांच्या प्रयोगशाळा: 561 (सरकारी 467 + खाजगी 94)

• CBNAAT आधारित चाचण्यांच्या प्रयोगशाळा : 109 (सरकारी 32 + खाजगी 77)

 

गेल्या 24 तासांत देशात एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 51,706 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर विक्रमी 67.19 टक्क्यांवर पोहचला आहे. आतापर्यंत एकूण 12,82,215 रुग्ण बरे झाले असून ही संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा दुप्पट आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत असल्यामुळे गेल्या 14 दिवसात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 63.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्राच्या “टेस्ट, ट्रॅक, ट्रिट” नीतीद्वारे सुरू असलेले कोविड - 19 प्रतिसाद आणि व्यवस्थापन यामुळे ही अपेक्षित सुधारणा दिसून येत आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांच्या एकत्रित प्रयत्नांनी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांसह नमुन्यांची वाढती चाचणी यामुळे गेल्या 14 दिवसात रुग्ण बरे होण्याचा दर 63 टक्क्यांवरून 67 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सतत वाढ होत असल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत 7 लाख इतकी झाली आहे. दररोज जास्तीत जास्त रुग्ण बरे होत असल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 5,86,244 (काल ही संख्या 5,86,298 इतकी होती) इतकी झाली असून हे रुग्ण वैद्यकीय उपचार घेत आहेत. केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या "टेस्ट, ट्रॅक, ट्रिट” धोरणाची एकत्रित अंमलबजावणी केल्याने सीएफआर अर्थात कोविड मृत्यू दर जागतिक परिस्थितीच्या तुलनेत कमी असून त्यात सातत्याने घट होत आहे. कोविड मृत्यू दर आज 2.09 टक्के इतका आहे.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्र राज्यात सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारत असून आता तो 65 टक्के इतका झाला आहे. हा दर राष्ट्राची सरासरी दराच्या म्हणजेच 66 टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. राज्यात 4.57 लाख रुग्णांपैकी 2.99 लाख रुग्ण बरे झाले असून 1.42 लाख सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईला पूर्वपदावर आणण्यासाठी महापालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेत लॉक डाऊनच्या नियमांना काही प्रमाणात शिथिल करत शहरातील व्यापार आजपासून काही प्रमाणात सुरू करण्याची परवानगी दिली आहे. शहरातील सम-विषम नियम रद्द करण्यात आला असून मॉल्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

 

 

Image

Image

* * *

G.Chippalkatti/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643596) Visitor Counter : 183