जलशक्ती मंत्रालय

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि स्मृती इराणी यांच्या हस्ते ‘स्वच्छ भारत क्रांती’ पुस्तकाचे प्रकाशन


स्वच्छ भारत क्रांती मध्ये 35 निबंधांद्वारे एसबीएमचा उल्लेखनीय प्रवास

Posted On: 04 AUG 2020 11:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्‍ट 2020


पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर यांनी संपादित केलेल्या “स्वच्छ भारत रेव्होल्यूशन ” या पुस्तकाचा हिंदीत अनुवाद करण्यात आला असून स्वच्छ भारत क्रांती म्हणून प्रकाशित केले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि केंद्रीय वस्त्रोद्योग व महिला आणि बाल विकास मंत्री  स्मृती इराणी यांनी आज नवी दिल्लीत या पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन केले.  त्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी  आणि परमेश्वरन अय्यर यांनी पुस्तक आणि स्वच्छ भारत अभियानावर  चर्चा केली. स्वच्छ भारत अभियानातील लाखो  कार्यकर्त्यांनी वेबकास्टिंगच्या माध्यमातून ही चर्चा पाहिली.

स्वच्छ भारत क्रांती या पुस्तकात विविध हितधारक आणि एसबीएममध्ये योगदान देत असलेल्या कार्यकर्त्यांनी  35 निबंधांद्वारे या सामाजिक क्रांतीबद्दल सांगितलेल्या त्यांच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेखनीय प्रवास बंदिस्त केला आहे. हे निबंध चार प्रमुख विभागांमध्ये आयोजित केले आहेत जे स्वच्छ भारत अभियानाच्या यशाचे चार महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत : राजकीय नेतृत्व, सार्वजनिक वित्तपुरवठा, भागीदारी आणि लोकांचा सहभाग. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावना या पुस्तकाला असून  अरुण जेटली, अमिताभ कांत, रतन टाटा, सद्गुरु, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, तवलीन सिंग, बिल गेट्स यांनी लिहिलेल्या निबंधांचे हे संकलन आहे.

या प्रसंगी बोलताना गजेंद्रसिंग शेखावत यांनी भारत जगात स्वच्छतेच्या नेत्यांपैकी एक नेता कसा बनला आणि केवळ पाच वर्षात 50 कोटींहून अधिक लोकांनी  शौचालयाचा वापर सुरू केला असून उघड्यावर शौच करणे थांबवले याबाबत  भारताच्या अनुभवातून अनेक देश शिकत आहेत.  ते म्हणाले की, स्वच्छ भारत क्रांतीच्या माध्यमातून हा प्रवास भारताच्या मध्यवर्ती भागातील लाखो वाचकांपर्यंत पोहचेल  याचा त्यांना आनंद आहे.

 स्मृती इराणी म्हणाल्या की, स्वच्छ भारत अभियान जनआंदोलन बनवण्यात महिलांनी पार पडलेल्या नेतृत्व भूमिकेचा त्यांना अभिमान आहे. त्या म्हणाल्या कि स्वच्छ भारत अभियान हे  नारी शक्तीचे खरे उदाहरण आहे आणि आतापर्यंत झालेला लाभ टिकवून ठेवण्यासाठी महिला एसबीएमच्या पुढच्या टप्प्यात असाच पुढाकार घेतील आणि भविष्यात कोणीही उघड्यावर शौचास जाणार नाही.  त्यानंतर मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वच्छग्रही , क्षेत्रीय पदाधिकारी आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या  प्रश्नांना  उत्तरे दिली.


* * * 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643475) Visitor Counter : 163