गृह मंत्रालय

राष्‍ट्रीय आपाद व्‍यवस्‍थापन संस्‍थेद्वारे आयोजित, जल हवामान जोखिम कमी करण्‍यावरील वेबीनार संपन्‍न

Posted On: 05 AUG 2020 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2020


एनआयडीएम आणि आयएमडी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘विजेसह वादळे आणि वीज कोसळणे’ या विषयावरच्या वेबिनारचे  केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, एनआयडीएमने भारतीय हवामान विभागाच्या सहकार्याने हायड्रोमेट्रोलॉजीकल संकटांची जोखीम कमी करण्याबाबत वेबीनार शृंखला आयोजित केली आहे. विजेसह वादळे आणि वीज कोसळणे,ढगफुटी आणि पूर, चक्रीवादळ आणि हवामान बदल आणि तीव्र हवामान विषयक घटना अशी चार वेबिनार आयोजित करण्यात आली आहेत. हायड्रोमेट्रोलॉजीकल संकटांचा धोका अधिक उत्तम जाणण्यासाठी मानवी क्षमता वृद्धिंगत करण्यावर आणि धोका कमी करण्यासाठी आणि परिसर आणि संबंधितांची लवचिकता वाढवण्यासाठी, पंतप्रधानांच्या दहा कलमी कार्यक्रमाची आणि सेन्दाई चौकटीची अंमलबजावणी करत त्यावर प्रभावी  समन्वयी कृती यावर यात भर देण्यात आला आहे. 

सध्या  हायड्रोमेट्रोलॉजीकल घटना तंत्रज्ञानाच्या क्षमतेने वेळ आणि जागा वर्तवू शकते. एनआयडीएम आणि आयएमडी, हवामान अंदाज क्षमता अधिक वृद्धिंगत करत असून त्याद्वारे अशा घटना अधिक अचूक आणि वेळेआधी वर्तवता येतील आणि संबंधीताना त्याचा फायदा होईल, आणि या संकटांचा धोका कमी करण्यासाठी  त्यासंदर्भात योग्य उपाय योजना करता येतील.

सर्व वेबिनार संवाद युट्यूबच्या खालील लिंकवर उपलब्ध आहेत:

ढगांचा गडगडाट आणि वीजा

https://www.youtube.com/watch?v=9Zv1Rms78dU

 

चक्रीवादळ आणि पूर

https://www.youtube.com/watch?v=G-P1CZB3krk

 

चक्रीवादळ आणि वादळ

https://www.youtube.com/watch?v=3TNRFsyuJGs

 

हवामानबदल आणि हवामानातील बदलत्या घटना

https://www.youtube.com/watch?v=77H2g3K-msM

 

* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643581) Visitor Counter : 132