उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींच्या कुटुंबीयांकडून 10 लाख रुपयांची देणगी


कोविड-19 विरोधातील लढाई आणि अयोध्या मंदिरासाठी प्रत्येकी 5 लाख रुपये

Posted On: 05 AUG 2020 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2020


उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या कुटुंबीयांनी आज कोविड-19 विरोधातील लढाई आणि अयोध्येतील राम मंदिरासाठी 10.00 लाख रुपयांची देणगी दिली. उपराष्ट्रपतींच्या पत्नी श्रीमती मुप्पावर्पू उषाम्मा नायडू यांनी पुढाकार घेऊन पुत्र हर्ष, स्नूषा श्रीमती राधा मुप्पावर्पू, कन्या दीपा व्यंकट, जावई व्यंकट इम्मानी आणि त्यांचे चार नातू यांच्याकडून वर्गणी जमा केली.

श्रीमती नायडू यांनी 5.00 लाख रुपयांचा धनादेश पीएम केअर्स निधीकडे पाठवला आणि दुसरा 5.00 लाख रुपयांचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे अयोध्येत आज झालेल्या भूमीपूजनानंतर राममंदिर उभारणीसाठी पाठवला.

मार्च महिन्यात, उपराष्ट्रपती नायडू यांनी आपले महिन्याचे संपूर्ण वेतन पीएम केअर्स निधीसाठी दिले होते आणि कोविड संक्रमणाविरोधातील लढाईत दर महिन्याला 30 % वेतन देण्याचे जाहीर केले होते.  
 

* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643564) Visitor Counter : 172