आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील कोविड रुग्णांमध्ये मृत्यूदर (सीएफआर) 1 एप्रिलपासून सर्वात कमी, 2.23 टक्क्यांवर


बरे झालेल्या रुग्णांची संख्या दहा लाखांच्या जवळ

गेल्या 24 तासांत 35,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे

प्रविष्टि तिथि: 29 JUL 2020 6:26PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 29 जुलै 2020

केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या चाचणी, मागोवा, उपचार (टेस्ट, ट्रॅक, ट्रीट) या धोरणाच्या समन्वयीत अंमलबजावणीमुळे  रुग्णांमधील मृत्यूदर (सीएफआर) जागतिक पातळीच्या तुलनेत प्रभावीपणे कमी करण्यावर भर दिला आहे, हा दर वेगाने घसरत आहे. 

सध्या मृत्यूदर 2.23 टक्के इतका  आहे.  1 एप्रिल 2020 पासून तो सर्वात कमी आहे.

केवळ  मृत्यूदर कमी झाला असे नाही, तर प्रभावी नियंत्रण धोरण, जास्तीत जास्त चाचण्या आणि एकूण देखभालीसाठी प्रमाणित क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमुळे सलग सहाव्या दिवशी प्रतिदिन 30,000  रुग्ण बरे झाले आहेत. 

बरे झालेल्या रुग्णांची संख्या जलदगतीने 10 लाखांच्या जवळ जात आहे. गेल्या 24 तासांत 35,286  रुग्णांना सुट्टी मिळाल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9,88,029 एवढी झाली आहे. कोविड-19 रुग्णांच्या बरे होण्याच्या दरात वाढ होऊन आता तो 64.51 टक्के एवढा झाला आहे.

रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय कोविड-19 रुग्ण यातील अंतर वाढत आहे, तो सध्या 4,78,582 आहे. वैद्यकीय निरीक्षणाखाली असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 5,09,447 एवढी आहे. 

कोविड 19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in.

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.

 

G.Chippalkatti/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1642089) आगंतुक पटल : 265
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam