पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान मोदी बँका आणि एनबीएफसीच्या हितधारकांबरोबर सामूहिक चर्चेत सहभागी होणार
Posted On:
28 JUL 2020 6:27PM by PIB Mumbai
पंतप्रधान मोदी उद्या संध्याकाळी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील हितधारकांबरोबर भविष्यासाठी कल्पना आणि रुपरेषेबाबत व्यापक चर्चा करणार आहेत.
चर्चेच्या मुद्द्यांमध्ये पत उत्पादने आणि सेवेसाठी कार्यक्षम मॉडेल्स, तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक सबलीकरण, वित्तीय क्षेत्राची स्थिरता आणि शाश्वतता यासाठी धोरणात्मक पद्धती यांचा समावेश आहे.
वित्तपुरवठा संबंधी पायाभूत सुविधा, शेती, एमएसएमईसह स्थानिक उत्पादन याद्वारे भारताच्या आर्थिक वाढीत योगदान देण्यात बँकिंग क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. तंत्रज्ञानाद्वारे वित्तीय सबलीकरणामध्ये आर्थिक समावेशकता मोठी भूमिका पार पाडू शकेल.
सरकारमधील वरिष्ठ अधिकारीही या संवादात सहभागी होतील.
****
B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1641844)
Visitor Counter : 193
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam