आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात कोविड-19 रुग्णांची वास्तविक संख्या 3.42 लाख

6.35 लाख रुग्ण बरे झाले असून यात वाढ होत आहे

1 % पेक्षा कमी रुग्ण व्हेंटीलेटरवर, 2 % पेक्षा कमी आयसीयू मध्ये आणि 3 % पेक्षा कमी रुग्ण ऑक्सिजन बेडवर

Posted On: 17 JUL 2020 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जुलै 2020

देशात सध्या  कोविड-19 रुग्णांची वास्तविक संख्या केवळ 3,42, 756  आहे. 6.35 लाखाहून (63.33%) अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

भारत हा 1.35 अब्ज लोकसंख्येंचा, जगातली  सर्वात मोठी लोकसंख्या असलेला दुसरा देश असून इथे दहा लाख लोकसंख्येत 727.4 रुग्ण आढळतात. हे प्रमाण जागतिक स्तरावर काही युरोपियन देशांच्या तुलनेत चार ते आठ पटीने कमी आहे.   दहा लाख लोकसंख्येत 18.6 मृत्यू ही भारतातली  आकडेवारी जगातल्या सर्वात कमी मृत्यू असलेल्या पैकी आहे. घरोघरी सर्वेक्षण, संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, प्रतिबंधित आणि बफर क्षेत्रात देखरेख, चाचण्या आणि वेळेवर निदान यासाठी सर्व राज्ये  आणि केंद्र्शासित प्र्देशाच्या समन्वयी प्रयत्नाने बाधित व्यक्तींचे लवकर निदान झाले. यामुळे उपचारही लवकर सुरु करण्यासाठी मदत झाली.

सौम्य, मध्यमआणि तीव्र अशा वर्गवारीसाठी भारताने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वैद्यकीय व्यवस्थापन सूचनावलीत दिल्याप्रमाणे आदर्श सूचनांचे पालन केले. प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन रणनीतीचे सकारात्मक परिणाम दिसून आले. लक्षणे नसणारे आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या सुमारे 80 % रुग्णांना गृह विलगीकरणात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले. मध्यमआणि गंभीर रुग्णांवर समर्पित कोविड रुग्णालये किंवा समर्पित कोविड आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. लक्षणे नसणारे आणि सौम्य लक्षणे असणाऱ्याना गृह विलगीकरणात ठेवल्याने रूग्णालयावरचा ताण कमी राहून गंभीर रुग्णांच्या उपचाराकडे आणि मृत्यू दर कमी राखण्यावर लक्ष केंद्रित करणे सुनिश्चित करता आले. 1.94% पेक्षा कमी रुग्ण आयसीयू मध्ये, 0.35%  व्हेंटीलेटरवर,तर  2.81 % रुग्ण ऑक्सिजन बेडवर  आहेत.

दाखल झालेल्या रुग्णांना दर्जेदार उपचार सुनिश्चित करण्यासाठी देशभरात वैद्यकीय पायाभूत सुविधांचा सातत्याने  विस्तार करण्यात येत आहे. या प्रयत्नामुळे कोविड-19 उपचारासाठी कोविड-19 रुग्णालये पायाभूत सुविधा आज मजबूत आहेत. देशात 1383 समर्पित कोविड रुग्णालये3107 समर्पित हेल्थकेअर केंद्रे, 10,382कोविड केअर केंद्रे आहेत. या सर्वांची एकत्रित क्षमता 46,673आयसीयू खाटा इतकी आहे. सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातल्या रुग्णालयात 21,848 व्हेंटीलेटर आहेत.एन 95 मास्क आणि पिपिई कीटचा तुटवडा नाही.केंद्राने 235.58लाख एन 95 मास्क आणि 124.26.लाख पीपीई कीट राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थाना पुरवले आहेत. कोविड-19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक तत्वे,आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/आणि @MOHFW_INDIA.

कोविड-19 शी संबंधित तांत्रिक विचारणा  : technicalquery.covid19[at]gov[dot]inयावर तर इतर मुद्दे  ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड-19 संदर्भात काही शंका असल्यास कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधा.. कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .वर उपलब्ध आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1639383) Visitor Counter : 256