PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 13 JUL 2020 7:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली-मुंबई, 13 जुलै 2020

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी संवाद साधला. पिचाई यांनी, कोविड-19 संबंधी जनजागृती करण्यासाठी आणि कोविड-19 विषयी लोकांना विश्वसनीय माहिती देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांना दिली. पंतप्रधानांनी उचललेल्या लॉकडाऊनच्या कठोर पावलामुळे या साथीच्या आजाराविरुद्ध पुकारलेल्या भारताच्या लढाईचा पाया अधिक मजबूत झाला, असे पिचाई यावेळी म्हणाले. चुकीच्या माहिती  विरुद्धच्या लढ्यात आणि आवश्यक सावधगिरी बाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात गुगलने पार पाडलेल्या सक्रीय भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. आरोग्यसेवा पुरविण्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी देखील त्यांनी चर्चा केली.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 च्या संक्रमणाला आळा घालणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी हाती घेतलेल्या सक्रीय, पूर्वदक्षतापूर्ण आणि समन्वयीत प्रयत्नांमुळे कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हळूहळू वाढते आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आणि वेळेत निदान यामुळे, सौम्य लक्षणे असतांनाच कोविड बाधित रूग्ण ओळखणे शक्य झाले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कठोर अंमलबजावणी, सर्वेक्षण यामुळे. संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आहे. लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना गृह विलगीकरणात, ऑक्सिमीटरचा वापर करुन त्यांच्यावर लक्ष ठेवल्याने रुग्णालयांवरील भार बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. अशा वर्गीकृत धोरणांमुळे आणि सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे गेल्या 24 तासांत कोविडचे 18,850 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,53,470 इतकी झाली आहे.

 आज देशातील रुग्ण बरे होण्याचा दर आणखी सुधारुन 63.02% पर्यंत पोहोचला. 19 राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरी दराच्या तुलनेत अधिक आहे. ही राज्ये खालीलप्रमाणे:-

 

राज्ये/केंद्रशासित प्रदेश

रुग्ण बरे होण्याचा दर

राज्ये/केंद्रशासित प्रदेश

रुग्ण बरे होण्याचा दर

लद्दाख

85.45%

त्रिपुरा

69.18%

दिल्ली

79.98%

बिहार

69.09%

उत्तराखंड

78.77%

पंजाब

68.94%

छत्तीसगड

77.68%

ओडिशा

66.69%

हिमाचल प्रदेश

76.59%

मिझोराम

64.94%

हरियाणा

75.25%

आसाम

64.87%

चंदिगढ

74.60%

तेलंगणा

64.84%

राजस्थान

74.22%

तामिळनाडू

64.66%

मध्य प्रदेश

73.03%

उत्तर प्रदेश

63.97%

गुजरात

69.73%

 

 

सध्या देशभरात 3,01,609 सक्रीय रूग्णांवर कोविड रूग्णालये, केअर सेन्टर्स किंवा घरी उपचार सुरु आहेत. देशात सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,51,861 ने अधिक आहे. गंभीर रुग्णांच्या उपचारपद्धतीत सुधारणा केल्यामुळे रुग्णांचा मृत्यूदर देखील 2.64%पर्यंत कमी झाला आहे. राष्ट्रीय टेलीकम्युनिकेशन सेंटर्सच्या माध्यमातून दिल्ली एम्स समर्पित कोविड रूग्णांना सातत्याने मार्गदर्शन करत आहे.खालील 30 राज्यांमध्ये कोविड मृत्यूदर राष्ट्रीय सरासरी दरापेक्षा कमी आहे.  

राज्ये/केंद्रशासित प्रदेश

मृत्यूदर

राज्ये/केंद्रशासित प्रदेश

मृत्यूदर

मणिपूर

0%

झारखंड

0.8%

नागालँड

0%

बिहार

0.86%

दादरा नगरहवेली- दीव दमण

0%

हिमाचल प्रदेश

0.91%

मिझोराम

0%

तेलंगणा

1.03%

अंदमान-निकोबार बेटे

0%

आंध्र प्रदेश

1.12%

सिक्कीम

0%

पुद्दुचेरी

1.27%

लद्दाख

0.09%

उत्तराखंड

1.33%

त्रिपुरा

0.1%

तामिळनाडू

1.42%

आसाम

0.22%

हरियाणा

1.42%

केरळ

0.39%

चंदिगढ

1.43%

छत्तीसगड

0.47%

जम्मू-कश्मीर

1.7%

ओडिशा

0.49%

कर्नाटक

1.76%

अरुणाचल प्रदेश

0.56%

राजस्थान

2.09%

गोवा

0.57%

पंजाब

2.54%

मेघालय

0.65%

उत्तर प्रदेश

2.56%

 

गेल्या 24 तासांत देशात 2,19,103 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 1,18,06,256 चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. आता हे प्रमाण 8555.25 इतके आहे .

देशातील चाचण्यांची क्षमता आणखी वाढवण्यात आली असून आता 1200 प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. त्यापैकी 852  सरकारी तर 348 खाजगी प्रयोगशाळा आहेत.

यानुसार,  

  • रियल टाईम RT  PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा : 626 (सरकारी : 389 + खाजगी : 237) 
  • TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 474 (सरकारी: 428 + खाजगी 46)
  • CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 100 (सरकारी: 35 + खाजगी: 65)

इतर

  • कोविड-19 मुळे आज संपूर्ण जग बदलले आहे; मात्र, भारतीय जनता, व्यवसाय आणि उद्योग या संकटाला बळी पडलेले नाहीत, परिस्थितीशी जुळवून घेण्याचा लवचिकपणा, तसेच संकटातून नवे मार्ग शोधण्याची वृत्ती या उपजत गुणांमुळे आपण संकटाचे रुपांतर संधीत केले आहे, असे मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले.  'बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'च्या 184व्या सर्वसाधारण सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यामातून त्यांनी आपले विचार मांडले. देशातल्या सर्वात जुन्या चेंबर्सपैकी एक असलेल्या या संस्थेचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते.
  • नीती आयोगाने संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय राजकीय मंचावर (एचएलपीएफ) शाश्वत विकास, 2020 हा विषय मध्यवर्ती ठेवून, दुसरा ऐच्छिक राष्ट्रीय आढावा सादर केला. शाश्वत विकासाच्या ध्येयपूर्तीचा, प्रगतीचा पाठपुरावा करून आढावा घेण्यासाठी एचएलपीएफ हा सर्वात महत्वाचा आंतरराष्ट्रीय मंच आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी ऐच्छिक राष्ट्रीय आढावा सादर केला. भारताने प्रस्तुत व्हीएनआर 2020 ला ‘‘डिकेड ऑफ अॅक्शन: टेकिंग एसडीजीएस फ्रॉम ग्लोबल टू लोकल’’ असे शीर्षक दिले आहे. या अहवालाचे प्रकाशन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, सदस्य डॉ. व्ही.के पॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, नीती आयोगाच्या सीडीजीएसच्या सल्लागार संयुक्ता समद्दर यांच्या हस्ते ‘एचएलपीएफ‘मध्ये करण्यात आले. कोविड-19 महामारीचा काळ लक्षात घेवून या फोरमच्यावतीने आभासी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 47 सदस्य सहभागी झाले आहेत. 10 ते 16 जुलै 2020 या काळात फोरमच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • सन 2030 पर्यंत भारतीय रेल्वेला हरित रेल्वेमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवून रेल्वे मंत्रालयाने जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी आणि हवामान बदलांचा सामना करण्यासाठी अनेक प्रमुख उपक्रम हाती घेतले आहेत. रेल्वे विद्युतीकरण, इंजिन आणि गाड्यांची ऊर्जा कार्यक्षमता सुधारणे, आस्थापना / स्थानकांचे हरित प्रमाणीकरण, गाड्यांच्या डब्यांमध्ये जैव शौचालये बसविणे आणि ऊर्जेच्या अक्षय स्त्रोतांकडे वळणे हे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या रेल्वेच्या धोरणाचा भाग आहेत.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाची मार्च, एप्रिल आणि मे 2020 या कालावधीतील भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिफारसयोग्य (निवड झालेल्या) उमेदवारांना याबद्दलची माहिती, व्यक्तिगतरीत्या टपालाद्वारे कळविण्यात आली आहे.
  • केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री किरेन रिजीजू सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्र्यांसमवेत, 14 आणि 15 जुलै रोजी दोन दिवसीय व्हिडीओ कॉन्फरन्स घेणार आहेत. क्रीडा विकास तळापर्यंत पोहोचण्यासाठी आणि नेहरू युवा केंद्र संघटन, एनवायकेएस  आणि राष्ट्रीय सेवा योजना, एनएसएस यांच्या देशभरातल्या घडामोडीसाठी, पथदर्शी आराखडा तयार करण्यासंदर्भात ही व्हिडीओ कॉन्फरन्स होणार आहे.
  • डॉ. हर्षवर्धन यांनी नवी दिल्लीत छतरपूर येथल्या सरदार पटेल कोविड सेवा केंद्राला  भेट दिली  आणि तिथल्या कोविड संबंधातल्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला. दिल्लीतल्या छतरपूर मधल्या 'राधा स्वामी सत्संग ब्यास' (RSSB) इथे 10,200 खाटांचे सरदार पटेल कोविड सेवा केंद्र उभारले असून  कोविडचा प्रसार रोखण्यासाठी  केंद्र आणि  दिल्ली सरकार एकत्रितपणे करत असलेल्या प्रयत्नांचा  तो एक भाग आहे.

महाराष्ट्र अपडेट्स

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 7827 नवीन केसेस नोंद झाल्या. राज्यातील एकूण रुग्ण संख्या 2,54,427 झाली आहे. यापैकी 1,40,325 रुग्ण बरे झाले आहेत राज्यातील एकूण मृत्यू संख्या रविवार पर्यंत 10,116 होती जी इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्त आहे. एकूण सक्रिय केसेसची संख्या 91,457 आहे. आज मध्यरात्रीपासून 23 जुलै पर्यंत पुणे पुन्हा एकदा लॉकडाऊन असेल. मुंबईमध्ये 1263 नवीन रुग्ण सापडले त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या 92,720 झाली आहे. केसेस दुप्पट होण्याचा मुंबईचा दर आता 50 दिवस आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्के आहे हे दोन्ही राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहेत.

FACTCHECK

***

MC/SP/PM

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1638378) Visitor Counter : 180