पंतप्रधान कार्यालय

इंडिया ग्लोबल वीक 2020 मध्ये पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण

Posted On: 09 JUL 2020 11:10PM by PIB Mumbai

 

नमस्ते! सर्व क्षेत्रातील मान्यवर अतिथी! आपणास भारताकडून शुभेच्छा. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी इंडिया आयएनसीचे आभार मानतो. मागील वर्षांमध्ये इंडिया आयएनसीने केलेल्या उत्कृष्ट कार्याचा एक भाग म्हणजे हा सध्याचा कार्यक्रम. आपल्या कार्यक्रमांमुळे भारतातील संधी जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यास मदत झाली आहे. भारत आणि संयुक्त राष्ट्र संघ  यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यात आपली मदत झाली आहे. मला आनंद आहे की या वर्षीचा कार्यक्रम इतर भागीदारांपर्यंत देखील पोहोचू शकला आहे. पुनःश्च अभिनंदन. आशा आहे की पुढच्या वर्षी आपणास सेंटर कोर्टमध्ये जाण्याची आणि विम्बल्डनचा आनंद घेण्याची संधी देखील मिळेल.

 

मित्रहो,

एकीकडे भारत जागतिक महामारीच्या विरोधात जोरदार लढाई लढत आहे. लोकांच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करतांना  आपण तितकेच अर्थव्यवस्थेच्या आरोग्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. जेव्हा भारत पुनरुज्जीवनाची चर्चा करतो तेव्हा ते काळजीसह पुनरुज्जीवन असते, करुणासह पुनरुज्जीवन होते, पुनरुज्जीवन जे टिकाऊ असते - पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठी. आम्ही भारतात संस्कृतीशी संबंधित आहोत जिथे प्रत्येकजण  माता समजून  निसर्गाची पूजा करतो. असा विश्वास आहे की पृथ्वी ही आपली माता आहे आणि आम्ही तिची मुले आहोत.

या काळात, पुनरुज्जीवनाबद्दल बोलणे स्वाभाविक आहे. जागतिक पुनरुज्जीवन आणि भारत यांना जोडणे तितकेच स्वाभाविक आहे. असा विश्वास आहे की जागतिक पुनरुज्जीवनाच्या या कथेत भारताची प्रमुख भूमिका असेल. मी दोन घटकांशी याचा निकटचा संबंध पाहतो. पहिली म्हणजे- भारतीय प्रतिभा.

 

मित्रहो,

संपूर्ण जगात, आपण भारताच्या प्रतिभा-शक्तींचे योगदान पाहिले आहे. यात भारतीय व्यावसायिक, डॉक्टर्स , परिचारिका, बँकर्स, वकील, वैज्ञानिक, प्राध्यापक, आमचे कष्टकरी कामगार यांचा समावेश आहे. भारतीय तंत्रज्ञान उद्योग आणि तंत्रज्ञान व्यावसायिक यांना  कोण विसरु शकेल. ते अनेक दशके मार्ग दाखवत आहेत. भारत  हा प्रतिभेचा  एक शक्ती स्रोत  आहे, जे योगदान करण्यास उत्सुक आहे, नेहमी शिकण्यास तयार आहे. तेथे द्वि-मार्ग समन्वय आहे जो मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे.

 

मित्रहो,

गेल्या सहा वर्षांमध्ये, एकूण वित्तीय समावेशन, रेकॉर्ड हाउसिंग आणि पायाभूत सुविधा, व्यवसाय सुलभीकरण, जीएसटी सह महत्त्वाच्या कर सुधारण, जगातील सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेच्या पुढाकारातून – आयुष्मान भारत, या गोष्टी म्हणजे भारताची मिळकत आहे. या नफ्यामुळे विकासाच्या पुढच्या टप्प्याचा पाया घातला गेला आहे.

 

मित्रहो,

जे अशक्य आहे असे मानले जाते ते शक्य करण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे. यात काहीच आश्चर्य नाही, आर्थिक पुनरुत्थानाचा विषय आला की भारतात आधीच त्याबाबतीत नवे मार्ग दिसू लागले आहेत. साथीच्या आजारात आम्ही आमच्या नागरिकांना दिलासा दिला आहे आणि सखोल रचनात्मक सुधारणा केल्या आहेत. आम्ही अधिक उत्पादनक्षम, गुंतवणुकीसाठी अनुकूल आणि स्पर्धात्मक. अर्थव्यवस्था बनवित आहोत

आपण देत असलेले  सहाय्य (मदत पँकेज) उत्तम असून गरीबातल्या गरीब  माणसाला सर्वात जास्त मदत मिळावी,या उद्देशाने ते बनविले आहे.तंत्रज्ञानाच्या मदतीने,त्यातील प्रत्येक पैसा  लाभधारकापर्यंत पोचला आहे. या मदत सहाय्यात मोफत स्वैपाकाचा गँस, बँकेच्या खात्यात रोकड, मोफत अन्नधान्य ,याशिवाय अनेक गोष्टी,लाखो लोकांपर्यंत पोचल्या आहेत. लाखो कामगारांना रोजगार मिळावा, यासाठी टाळेबंदी उठल्यानंतर लगेचच आपण जगातील सर्वांत मोठ्या सार्वजनिक प्रकल्पांना आरंभ केला. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला परत ऊर्जितावस्था प्राप्त होईलच, पण त्याशिवाय ग्रामीण भागात कायमस्वरूपी पायाभूत सुविधाही निर्माण होतील.

 

मित्रांनो,

भारत ,ही  जगातील एक सर्वात मुक्त अर्थव्यवस्था आहे. आपण जगातील सर्व उद्योगांना भारतात येऊन(गुंतवणूक करायला) त्यांचे उद्योग सुरु करायला चांगल्या संधी(रेड कार्पेट पसरत आहोत) उपलब्ध करून देत आहोत. आजच्या दिवसाला जगातील अतिशय कमी देश अशा संधी इतरांना देऊ शकतील.भारतात,नव्याने उदयास येणाऱ्या अनेक क्षेत्रांत विपुल संभावना  आणि  संधी उपलब्ध आहेत. आपण  कृषी  क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे, साठवणूक आणि (लाँजिस्टिक्सच्या) वाहतूक पुरवठा यात गुंतवणूक करण्याच्या अनेक आकर्षक संधी कृषी क्षेत्रात उपलब्ध झालेल्या आहेत. आम्ही गुंतवणूकदारांसाठी  गुंतवणुकीचे दरवाजे उघडून, शेतकऱ्यांच्या श्रमांत थेट गुंतवणूक करायला मार्ग मोकळा केला आहे

 

मित्रांनो,

आम्ही  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगात(MSME) बदल घडवून आणले आहेत.  वेगात वाढणार्या  एमएसएमई क्षेत्राची मोठ्या उदयोगांना मदत होईल.संरक्षण क्षेत्रातही गुंतवणूकीच्या संधी आहेत.प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीच्या अटी शिथिल करून, जगातल्या सर्वात मोठ्या सैन्यासाठी  गुंतवणूक करून, उत्पादने तयार करायची संधी आम्ही देत आहोत. आता अंतराळ क्षेत्रात देखील खाजगी गुंतवणुकीच्या संधी आहेत.त्यामुळे लोकांच्या फायद्यासाठी अंतराळ क्षेत्रात स्पेस टेक्नॉलॉजीचा व्यावसायिक उपयोग करायला मोठा वाव आहे. भारताचे तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्र उत्साहीत करणारे आहे. डिजिटली सक्षम असलेल्या, लाखो महत्वाकांक्षी लोकांची ही बाजारपेठ आहे.कल्पना करा,कितीतरी उत्पादने त्यांच्यासाठी तयार करता येतील.

 

मित्रांनो,

या महामारीने दाखवून दिलं की,भारताचा औषध उत्पादन उद्योग हा केवळ भारताचाच नव्हेतर संपूर्ण जगाचा ठेवा आहे. या उद्योगाचा विशेषतः विकसनशील देशांतील औषधांच्या किमती कमी करण्यात मोठा हिस्सा आहे. लहान मुलांसाठी लागणाऱ्या जगातील दोन तृतीयांश लसी /व्हँक्सिन्स भारतात बनतात. कोविड-19साठी लस बनविण्याच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेल्या प्रयत्नात आमच्या कंपन्यांचा सक्रीय सहभाग आहे. मला पूर्ण खात्री आहे ,लसीचा शोध लावण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावेल, तसेच शोध लागल्याबरोबर त्याचे उत्पादन वाढवूही शकेल.  

 

मित्रांनो,

130 कोटी भारतीयांना आत्मनिर्भर भारताची हाक दिली आहे. स्वनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारताचा,देशांतर्गत उत्पादन आणि वापर ,जागतिक  पुरवठा साखळीबरोबर एकजीव झाला आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वतःपुरते पहाणे वा जगापासून अलिप्त होणे नव्हे तर स्वतः टिकून  स्वनिर्मिती करणे. कार्यक्षमता,सम दृष्टी  आणि प्रतिकारशक्ती या  धोरणांच्या   पुरस्कारांसाठी  आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.

 

मित्रांनो,

पंडित रवीशंकर यांची जन्मशताब्दी , याच व्यासपीठावरून (साजरी)  होत आहे, याचा  मला आनंद होतो आहे.त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील सौंदर्य जगाला दाखवून दिले.आपण हेही पाहिलंत की, ‘नमस्ते’ ही  जागतिक दर्जाची स्वागत करण्याची पद्धत म्हणून रूढ झाली. या महामारीमुळे  जगभरात योग, आयुर्वेद आणि पारंपारिक औषधे यांना   सातत्याने पसंती मिळत आहे. भारताची प्राचीन संस्कृती आणि भारताचे  शांतिप्रिय सार्वभौमत्व ही आपली ताकद आहे.

 

मित्रांनो,

जगाकरीता अजूनही काही उत्तम  आणि संपन्न गोष्टी करता आल्या तर भारत तयार आहे. असा हा सुधारणाप्रिय, कार्यरत आणि परिवर्तनशील भारत देश आहे. नवनवीन आर्थिक संधी देणारा हा भारत देश आहे. मानवकेंद्रीत आणि सर्वसमावेशक विकासाच्या  दृष्टीने अंगिकार करणारा भारत देश आहे.

भारत तुमची वाट पहात आहे.

नमस्ते,

धन्यवाद

****

B.Gokhale/S.Sheikh/S.Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1637721) Visitor Counter : 218