PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 07 JUL 2020 7:34PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 7 जुलै 2020

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

जागतिक आरोग्य संघटनेचा  6 जुलै 2020 चा स्थिती अहवाल दर्शवितो की दहा लाख लोकसंख्येमागे कोविड -19 चे सर्वात  कमी रुग्ण असलेल्यांपैकी भारत एक आहे. भारताचा दर 505.37 प्रति दहा  लाख लोकसंख्या आहे तर जागतिक सरासरी 1453.25 आहे.

WhatsApp Image 2020-07-07 at 13.33.41.jpeg

चिलीमध्ये कोविड -19 चे दहा लाख लोकसंख्येमागे 15,459.8 रुग्ण आढळले आहेत, तर पेरू, अमेरिका, ब्राझील आणि स्पेनमध्ये दहा लाख लोकसंख्येमागे हा दर अनुक्रमे 9070.8, 8560.5, 7419.1 आणि 5358.7 रुग्ण  इतका आहे.

WhatsApp Image 2020-07-07 at 13.24.01.jpeg

जागतिक आरोग्य संघटनेचा स्थिती अहवाल असेही दर्शवितो की  दहा लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण असलेल्या देशांपैकी भारत एक आहे.  भारतातील दहा लाख  लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण  14.27 आहे तर जागतिक सरासरी चार पटीपेक्षा अधिक म्हणजेच 68.29. इतकी आहे.

ब्रिटनमध्ये कोविड -19 संबंधित मृत्यूचा दर दहा लाख लोकसंख्येमागे  651.4 रुग्ण आहे तर  स्पेन, इटली, फ्रान्स आणि अमेरिकेत हे प्रमाण अनुक्रमे 607.1, 576.6, 456.7 आणि 391.0  इतके आहे.

रुग्णांचे प्रभावीपणे आणि पुरेशा प्रमाणात व्यवस्थापन करण्यासाठी भारताने रुग्णालय संबंधी पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली. ऑक्सिजन आधार, आयसीयू आणि व्हेंटिलेटर सुविधांचा या सज्जतेत समावेश होता. 7 जुलै 2020 पर्यंत, अति गंभीर तसेच अत्यंत  सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रूग्णांची देखभाल करण्यासाठी 1201 समर्पित कोविड रुग्णालये,  2611 समर्पित  कोविड आरोग्यसेवा केंद्र आणि 9909 कोविड केअर सेंटर आहेत. अशा प्रकारच्या सज्जतेमुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने सुधारणा झाल्याचे तसेच मृत्युदर कमी राहिल्याचे दिसून आले आहे.

कोविड 19 रुग्णांचे लवकर निदान आणि वेळेवर प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन यामुळे रुग्ण बरे होण्याचे रोजचे प्रमाण वाढत आहे. गेल्या  24 तासांत एकूण 15,515 रुग्ण बरे झाले असून कोविड -19 रुग्णांपैकी बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आतापर्यन्त 4,39,947 इतकी झाली आहे.

कोविड-19 ला प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन यासाठी राष्ट्रीय आणि राज्य सरकारच्या सर्व स्तरांवरील  समन्वित प्रयत्नांमुळे बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण  (अ‍ॅक्टिव्ह) यामधील अंतर सातत्याने वाढत असून उत्साहवर्धक परिणाम  दिसून येत आहेत. आजच्या तारखेला  कोविड -19 च्या सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे झालेल्यांची संख्या 1,80,390 ने अधिक आहे. कोविड -19 बाधित रुग्ण बरे होण्याचा दर आज वाढून 61.13% झाला आहे.

सध्या 2,59,557 रुग्णांवर उपचार सुरु असून  सर्व वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

चाचणी, शोध , उपचार ” वर वाढता भर, विविध उपाययोजनांमध्ये वाढ यामुळे राज्ये / केंद्रशासित प्रदेशांद्वारे व्यापक प्रमाणात कोविड 19 ची चाचणी सुलभ केली आहे. यामुळे दररोज 2 लाखाहून अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत. गेल्या 24 तासांत 2,41,430 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. या वाढीमुळे कोविड -19  साठी देशभरात आतापर्यंत 1,02,11,092 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

चाचणी प्रयोगशाळेचे नेटवर्क निरंतर विस्तारत आहे ज्यात विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील वाढत्या प्रयोगशाळा जोडल्या जात आहेत. सरकारी क्षेत्रात 793 प्रयोगशाळा आहेत तर 322  खासगी प्रयोगशाळा असून  देशात एकूण 1115 प्रयोगशाळा आहेत.

या आहेत-

रियल-टाईम RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 598 (सरकारी:372 + खाजगी: 226 )

TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 423  (सरकारी: 388 + खाजगी: 35)

CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 94 (सरकारी: 33 + खाजगी:  61)

इतर

  • आयुष मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एनएमपीबी) आणि कृषी संशोधन व शिक्षण विभागांतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद आयसीएआर च्या राष्ट्रीय वनस्पती आनुवंशिक संसाधन केंद्राने (एनबीपीजीआर) 6 जुलै, 2020 रोजी सामंजस्य करार केला आहे. राष्ट्रीय जनुक बँकेत दीर्घकालीन साठवणीसाठी (उपलब्धतेनुसार) भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) च्या राष्ट्रीय वनस्पती आनुवंशिक संसाधन केंद्राच्या नियुक्त जागेवर किंवा मध्यम मुदतीच्या साठवणीसाठी क्षेत्रीय ठिकाणी औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या आनुवंशिक संसाधनांचे (एमएपीजीआर) संवर्धन करण्यासाठी तसेच राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या  कार्यरत गटाला वनस्पती अनुवांशिक स्रोतांच्या संवर्धन तंत्रावर प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला.
  • कोविड-19 ला रोखणे, विलगीकरण आणि त्यासंबधित व्यवस्थापनासाठी भारत सरकार, राज्य सरकारांच्या सहकार्याने अथक परिश्रम करत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत असणारी बिरबल सहानी प्राचिन विज्ञान संस्था (BSIP), ही स्वायत्त संस्था उत्तर प्रदेश सरकारच्या बरोबर कोविड-19 विरुद्ध लढ्यात उतरणार आहे. BSIP ही कोविड-19च्या प्रयोगशाळा चाचण्या सुरु करण्यासाठी प्राथमिक पावले टाकणाऱ्या पाच केंद्र सरकारी संशोधन संस्थापैकी एक आहे.
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने, केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पाठवलेल्या पत्रात, विद्यापिठे आणि शैक्षणिक संस्थाना, परीक्षा घ्यायला परवानगी दिली आहे. यूजीसीच्या परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रकाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंजूर केलेल्या मानक प्रचालन प्रक्रीये (एसओपी) नुसार विद्यापीठांसाठी अंतिम सत्र परीक्षा घेणे अनिवार्य आहे.
  • भारत सरकाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेल्या एनएटीएमओ’ म्हणजेच 'नॅशनल अॅटलस अँड थेमॅटिक मॅपिंग ऑर्गनायझेशन'-नॅटमो’च्या  http://geoportal.natmo.gov.in/Covid19/ अधिकृत पोर्टलवर कोविड-19 डॅशबोर्डची चौथी अद्ययावत आवृत्ती दि. 19 जून, 2020 रोजी जारी करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र अपडेट्स

“मिशन पुन्हा सुरुवात” च्या पाचव्या टप्प्याअंतर्गत महाराष्ट्र सरकार हळूहळू निर्बंध उठवत आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस 33% वापरासह सुरू करण्याची  परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्राने 5,368 नवीन केसेसची नोंद केली त्यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 2,11,987 झाली आहे. सोमवारी 3,522 रुग्ण बरे झाले.  बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,15,262 झाली आहे. राज्यात 87,681 सक्रिय रुग्ण आहेत.

FACTCHECK

A stamp with the words factually incorrect on a  report published by The Wire which claims that ncpcr has seen 8 fold increase in complaints post outbreak

 

****

MC/SP/PK

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1637039) Visitor Counter : 274