आयुष मंत्रालय

राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आणि आयसीएआर-राष्ट्रीय वनस्पनी आनुवंशिक संसाधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार


सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकालीन, सुरक्षित आणि किफायतशीर अनुवांशिक स्रोतांच्या (जर्मप्लाझम) संवर्धनासाठी आंतर-मंत्रालयीन सहकार्य

Posted On: 07 JUL 2020 5:26PM by PIB Mumbai

 

आयुष मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एनएमपीबी) आणि कृषी संशोधन व शिक्षण विभागांतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद आयसीएआर च्या राष्ट्रीय वनस्पनी आनुवंशिक संसाधन केंद्राने (एनबीपीजीआर) 6 जुलै, 2020 रोजी सामंजस्य करार केला आहे. राष्ट्रीय जनुक बँकेत दीर्घकालीन साठवणीसाठी (उपलब्धतेनुसार) भारतीय कृषी संशोधन परिषद आयसीएआर च्या राष्ट्रीय वनस्पती आनुवंशिक संसाधन केंद्राच्या नियुक्त जागेवर किंवा मध्यम मुदतीच्या साठवणीसाठी क्षेत्रीय ठिकाणी औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या आनुवंशिक संसाधनांचे (एमएपीजीआर) संवर्धन करण्यासाठी तसेच राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या  कार्यरत गटाला वनस्पती अनुवांशिक स्रोतांच्या संवर्धन तंत्रावर प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला.

वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकालीन, सुरक्षित आणि किफायतशीर अनुवांशिक स्रोतांच्या (जर्मप्लाझम) संवर्धनातून एनएमपीबी आणि आयसीएआर-एनबीपीजीआर हे राष्ट्रीय हित जोपासण्यात वचनबद्ध आहेत. आयसीएआरच्या वतीने अधिकृत संस्था एनएमपीबी आणि आयसीएआर-एनबीपीजीआर या एमएपीजीआरच्या बियाणे साठवणुकीसाठी तपशीलवार कार्यक्षमता विकसित करतील आणि नियतकालिक प्रगती अहवाल संबंधित संस्थांना सादर करतील.

औषधी वनस्पतींना पारंपारिक औषधांचे समृद्ध स्त्रोत मानले जाते आणि आरोग्य सेवा प्रणालीमध्ये ती हजारो वर्षांपासून वापरली जात आहेत. भारतामध्ये औषधी वनस्पती संसाधनांची समृद्ध विविधता असली तरी त्यांच्या उत्पत्तिस्थानावरील विविध विकासकामांमुळे हळूहळू नैसर्गिक संसाधने कमी होत आहेत. या नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करण्याची आणि त्यांचा शाश्वत उपयोग करण्याची गरज आहे. वनस्पती अनुवांशिक संसाधनांचे संवर्धन हा जैवविविधता संवर्धनाचा अविभाज्य भाग आहे. नैसर्गिक स्त्रोतांचे संरक्षण करणे आणि त्यांचा उपयोग करून जनुके व प्रजातींचे विविध प्रकार कमी होऊ नयेत किंवा महत्वाची वसतिस्थाने व परिसंस्था नष्ट होऊ नयेत यासाठी शाश्वत विकास करणे हा संवर्धनाचा हेतू आहे.

****

B.Gokhale/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1637001) Visitor Counter : 447