विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
उत्तर प्रदेशात कोविड-19शी दोन हात करण्यासाठी BSIP आणि उत्तर प्रदेश सरकार एकत्र काम करणार
Posted On:
07 JUL 2020 4:21PM by PIB Mumbai
कोविड-19ला रोखणे, विलगीकरण आणि त्यासंबधित व्यवस्थापनासाठी भारत सरकार, राज्य सरकारांच्या सहकार्याने अथक परिश्रम करत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत असणारी बिरबल सहानी प्राचिन विज्ञान संस्था (BSIP), ही स्वायत्त संस्था उत्तर प्रदेश सरकारच्या बरोबर कोविड-19 विरुद्ध लढ्यात उतरणार आहे. BSIP ही कोविड-19च्या प्रयोगशाळा चाचण्या सुरु करण्यासाठी प्राथमिक पावले टाकणाऱ्या पाच केंद्र सरकारी संशोधन संस्थापैकी एक आहे.
संस्थेच्या BSL-2A प्रयोगशाळेत उपलब्ध असणाऱ्या प्राचिन DNA मुळे अशी चाचणी करणे शक्य झाले आहे.
BSIP ला 2 मे 2020ला संशयित कोविड रुग्णाचे नमुने चंदोली जिल्ह्यातून परिक्षणासाठी मिळाले. तेव्हापासून 24x7 सुरू असणाऱ्या प्रयोगशाळेत दिवसभरात नोडल आधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमधील साधारण 400 नमुन्यांचे परिक्षण होते.
आजपर्यंत 12,000 पेक्षा अधिक नमुन्यांचे परिक्षण झाले आहे, त्यापैकी चारशेहून जास्त नमुने SARS-CoV-2 बाधित असल्याचे नोंदवले गेले आहे. मर्यादित संसाधने तसेच मनुष्यबळ यामुळे येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर हे अधिक कौतुकास्पद आहे.
BSIP संचालक वंदना प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली या कामासाठी BSIPच्या कार्यक्षम, समर्पित शास्त्रज्ञांचा चमू निवडला गेला. डॉ. अनुपमा शर्मा, पवन गोविल, कमलेश कुमार, शैलेश अगरवाल, विवेक वीर कपूर, संतोष पांडे आणि नीरज राय ही त्यापैकी काही नावे आहेत. नीरज राय हे कोविड-19 परिक्षण प्रयोगशाळेचे प्रभारी होते. त्यांना अनुजकुमार त्यागी (सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ), GMC, कनौज, सत्य प्रकाश, डॉ वरूण शर्मा, डॉ इंदू शर्मा, नागार्जुना पी, प्रशांत, हर्ष, आणि रिचा यांनी चाचणीपरीक्षा आणि निकालांचे विश्लेषण तसेच स्पष्टीकरण या कामी अतिशय मोलाची साथ दिली.
कोविड-19चा लढ्यात BSIP चमूने अशाप्रकारे आपले योगदान दिले आहे. कोविड-19 परिक्षणाच्या कामात लखनौमधील संशोधन संस्था भारतात दुसऱ्या स्थानावर आहेत.
”BSIP तील कोरोनो विषाणूसाठीची RT-PCR चाचणी हे अडचणीवर मार्ग काढत उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य गतीशील वापर करणे याचे उत्तम उदाहरण आहे. सर्व संबधित, त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा, दृढनिश्चय आणि हिंमत यामुळेच हे शक्य झाले”, असे प्रतिपादन आशुतोष शर्मा सचिव DST यांनी केले.
*****
S.Pophale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636980)
Visitor Counter : 220