अर्थ मंत्रालय
20 लाखांहून अधिक करदात्यांना आयकर विभागाकडून कोविड-19 महामारीच्या काळात 62,361 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा
Posted On:
03 JUL 2020 2:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2020
कोविड-19 महामारीच्या काळात करदात्यांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून,प्रलंबित आयकर परतावे जारी करावेत या केंद्र सरकारच्या निर्णयासंदर्भात 8 एप्रिल 2020 ला काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, आयकर विभागाने 8 एप्रिल ते 30 जून 2020 या काळात प्रती मिनिट 76 प्रकरणे या वेगाने कर परतावे जारी केले. कामकाजाच्या केवळ 56 दिवसात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) 20.44 लाखापेक्षा जास्त प्रकरणात 62,361 कोटी रुपयांहून अधिक परतावा जारी केला. करदात्यांसाठी उपयोगी ठरणाऱ्या, आयकर विभागाच्या या पावलामुळे करदात्यांना कोविड-19 महामारीच्या कठीण काळात रोकड सुलभता राहण्यासाठीही मदत झाली आहे. या काळात 19,07,853 प्रकरणात करदात्यांना 23,453.57 कोटी रुपयांचे परतावे तर 1,36,744 प्रकरणात 38,908.37 कोटी रुपयांचे कंपनी कर परतावे जारी करण्यात आले. पूर्णतः इलेक्ट्रॉनिक प्रक्रियेच्या माध्यमातून परतावे जारी करण्यात आले असून रक्कम करदात्याच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे. परतावा जारी करण्याची विनंती करण्यासाठी आयकर विभागापर्यंत पोहोचवण्याची करदात्याला आवश्यकता पडली नाही. त्यांच्या बँक खात्यात थेट परतावा जमा झाला.
करदात्यांनी विभागाच्या ई-मेलना तातडीने प्रतिसाद द्यावा त्यामुळे त्यांच्या बाबतीतही परतावा प्रक्रिया सुरु करून जारी करता येईल याचा सीबीडीटीने पुनरुच्चार केला आहे. आयकर विभागाच्या ई-मेल मधे करदात्याना त्यांच्या प्रलंबित मागण्या, बँक खाते क्रमांक यांची पुष्टी करण्याबाबत विचारणा करण्यात येते. अशा सर्व प्रकरणात करदात्याकडून जलद प्रतिसाद आल्यास आयकर विभागाला त्यांची परतावा प्रक्रिया जलदगतीने करणे शक्य होते.
* * *
S.Thakur/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636127)
Visitor Counter : 273
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam