आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड 19 सद्यस्थिती


रुग्ण बरे होण्याचा दर झपाट्याने 60 टक्क्यांचा टप्पा गाठणार

बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत 1,32,912

Posted On: 02 JUL 2020 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2020

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सर्व स्तरातील शासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत सातत्याने वाढत आहे. आजमितीस सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 1,32,912 हून अधिक आहेत.

कोविड -19 रुग्णांच्या वेळेवरील रुग्णालयीन व्यवस्थापनामुळे दररोज 10,000 हून जास्त रुग्ण बरे होत आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 11,881 कोविड -19 रूग्ण बरे झाले असून त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,59,859 पर्यंत पोहोचली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 59.52% इतका झाला आहे.

सध्या 2,26,947 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

कोविड -19 मधून पूर्णपणे बरे झालेल्यांच्या आकडेवारीनुसार अव्वल 15 राज्ये:

अनुक्रमांक

राज्य/केंद्रशासित प्रदेश

पूर्ण बरे झालेले

1

महाराष्ट्र

93,154

2

दिल्ली

59,992

3

तामिळनाडू

52,926

4

गुजरात

24,030

5

उत्तर प्रदेश

16,629

6

राजस्थान

14,574

7

पश्चिम बंगाल

12,528

8

मध्य प्रदेश

10,655

9

हरियाणा

10,499

10

तेलंगण

8,082

11

कर्नाटक

8,063

12

बिहार

7,946

13

आंध्र प्रदेश

6,988

14

आसाम

5,851

15

ओदिशा

5,353

 

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणानुसार अव्वल 15 राज्ये:

अनुक्रमांक

राज्य/केंद्रशासित प्रदेश

रुग्ण बरे होण्याचा दर

1

चंदिगढ

82.3%

2

मेघालय

80.8%

3

राजस्थान

79.6%

4

उत्तराखंड

78.6%

5

छत्तीसगढ

78.3%

6

त्रिपुरा

78.3%

7

बिहार

77.5%

8

मिझोरम

76.9%

9

मध्य प्रदेश

76.9%

10

झारखंड

76.6%

11

ओदिशा

73.2%

12

गुजरात

72.3%

13

हरियाणा

70.3%

14

लडाख

70.1%

15

उत्तर प्रदेश

69.1%

 

चाचणी, रुग्णशोध, उपचार धोरणानुसार, दररोज चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये सातत्याने वाढ झाली असून आजपर्यंत 90 लाखाहून अधिक नमुने तपासले गेले आहेत. गेल्या 24 तासांत 2,29,588 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या, 90,56,173 आहे.

देशातील चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणखी वाढविण्यात आली आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 768 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 297 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे देशात एकूण 1065 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 578 (शासकीय: 366 + खाजगी: 212)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 398 (शासकीय: 370 + खाजगी: 28)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 89 (शासकीय: 32 + खाजगी: 57)

कोविड -19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्या: https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1635950) Visitor Counter : 207